चोपडा : प्रतिनिधी
येथील उपजिल्हा जिल्हा रुग्णालयास भेट देऊन पोलिसांद्वारे मारहाण होऊन जखमी झालेले माजी सैनिक पंकज पाटील यांची खा.रक्षाताई खडसे यांनी भेट घेवून संवाद साधला तसेच घटनेची माहिती घेऊन चोपडा तालुका आजी-माजी सैनिक सेवा भावी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांकडून निवेदन स्विकारले व योग्यती कार्यवाहीसाठी पाठपुरावा करणे बाबत आश्वासन दिले.
यावेळी भाजप तालुकाध्यक्ष पंकज पाटील, शहराध्यक्ष गजेंद्र जैसवाल, जिल्हाउपाध्यक्ष राकेश पाटील, व्यापारी आघाडी जिल्हा उपाध्यक्ष रविंद्र मराठे, भाजयुमो जिल्हा चिटणीस मनोज सनेर, रावेर महिला आघाडी अध्यक्षा रेखा बोंडे, भाजयुमो तालुकाध्यक्ष प्रकाश पाटील, चंद्रशेखर पाटील, जेष्ठनेते अॅड.एस.डी.सोनवणे, पं.स.सदस्य श्री.भरत बाविस्कर, भाजयुमो शहराध्यक्ष श्री.विशाल भोई, तालुका चिटणीस श्री.भरत सोनगिरे, विधानसभा सोशल मिडीया श्री.प्रमुख मिलिंद वाणी, भाजयुमो शहर उपाध्यक्ष श्री.आकाश नेवे ई. आदि पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.