जळगाव मिरर | २१ ऑगस्ट २०२४
शहारातील इंद्रप्रस्थ नगर मित्र मंडळातर्फे श्री दत्त मंदिर जवळ श्री गुरु दत्त माऊली गौ शाळेची उभारणी करण्यात आली असून या गौ शाळेचे उद्घाटन नुकतेच प्रमुख पाहुणे माजी उपमहापौर डॉ.अश्विन शांताराम सोनवणे, राहुल सोनवणे, आबा बाविस्कर, दिलीप पोकळे, गोविंद तिवारी, पिंटू सपकाळे यांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमाला विनोद बडगुजर, लक्ष्मण तिवारी, दिलीप पिंगळे, गोपाल तायडे, युवराज परदेशी ,दिपक भालेराव,र वींद्र बडगुजर,सोनु बांगड,मुकेश तिवारी, अरुण पांडे, दिलीप भावसार,दिनेश थोरवे, मनोज तिवारी, दाऊ सोनवणे, भुषण दांडेकर यांची उपस्थिती होती. तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी ईश्वर हिरे, आशिष शिरसाठ, साहिल भालेराव , बंटी तिवारी, दिपक भट, अक्षय दुबे, किरण परदेशी यांनी केले होते. तर परिसरातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.