रावेर : प्रतिनिधी
तालुक्यातील मौजे खिरोदा प्र.यावल येथे आज दि २७ ऑगस्ट २०२२ रोजी कै.राजराम इच्छाराम चौधरी (गुरुजी) यांचे स्मरणार्थ “सार्वजनिक व्यायाम शाळा” तसेच “दादासाहेब – भाऊसाहेब व्यापारी संकुल” अशा विकास कामांचे खासदार रक्षाताई खडसे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.
यावेळी माजी जि.प.अध्यक्षा रंजना पाटील, श्री.भरत महाजन, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन, भाजयुमो जिल्हाध्यक्ष श्रीकांत महाजन, भाजपा तालुकाध्यक्ष राजन लासुरकर, महिला आघाडी तालुकाध्यक्षा रेखा बोंडे, नथू धांडे, हरलल कोळी, गोटूभाऊ गाजरे, भाजयुमो सरचिटणीस शुभम पाटील, सरपंच संताबाई भारंबे, उपसरपंच राहुल चौधरी, ग्रा.पं.सदस्य पंकज इंगळे, संजय नेहेते, करुणा चौधरी, सरिता तायडे, पी.आर.चौधरी सर, भरत चौधरी, भास्कर चौधरी, राहूल बडगे यांच्यासह ग्रामस्थ व कार्यकर्ते उपस्थित होते.