जळगाव मिरर | १७ ऑगस्ट २०२४
रोजलँड इंग्लिश मीडियम हायस्कूल आणि रोजलँड प्राथमिक विद्यामंदिर येथे शाळेचा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. या सोहळ्यात प्रमुख पाहुण्या म्हणून ज्येष्ठ नागरिक व जळगावातील पहिल्या महिला टेलिफोन ऑपरेटर तसेच सामाजिक कार्यकर्त्या, सौ. सुषमा हेमचंद्र प्रधान उपस्थित होत्या. त्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
शाळेच्या वतीने मुनिरा तरवारी मॅडम यांनी सौ.सुषमा प्रधान मॅडम यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. विद्यार्थ्यांनी देशावर भाषण व समूहगीत गायन केले तसेच बालकलाकारांनी स्वातंत्र्यसैनिकांच्या वेशभूषेत त्यांची सुवचने सादर केली.
रोजलँडच्या अध्यक्षा मा. सौ. रोजमीन खिमानी प्रधान यांनी फ्लोरिडा येथून शुभेच्छा संदेश पाठवला. कार्यक्रमास विद्यार्थी, पालक, व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी पथसंचलनही केले. श्री. जितेंद्र सोनावणे, आदर्श शिक्षक पुरस्कार विजेते, यांनी विद्यार्थ्यांकडून मार्चिंग कॉर्पस करवून घेतले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नववी व दहावी चे विद्यार्थी मुद्दसिर, मुंत्तासिब, पार्थ आणि नेहा यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाची सांगता विद्यार्थ्यांना बिस्किट वाटप करून करण्यात आली.