जळगाव मिरर | २२ जुलै २०२५
ओळखीतून तेरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला. या अत्याचारातून मुलगी गर्भवती झाल्याची घटना पारोळा तालुक्यात घडली. याप्रकरणी संशयिताविरुद्ध पोक्सोतंर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे कि, पारोळा तालुक्यात १३ वर्षीय अल्पवयीन मुलगी वास्तव्यास आहे. दि. १फेब्रुवारी ते दि. ३१ मार्च दरम्यान, पीडित मुलगी पारोळा येथील शाळेतून घरी येत असताना, पारोळा बसस्थानकावर ह्यसोनूह्न नावाच्या एका मुलासोबत तीची ओळख झाली. या ओळखीचा फायदा घेत त्याने पीडित मुलीला आपल्या दुचाकीवर बसवून त्याने शहरातील एका हॉटेलमध्ये नेवून मुलीवर अत्याचार केला. पहिल्यांदा हा प्रकार फेब्रुवारी २०२५ मध्ये घडला होता. त्यानंतर, काही दिवसांनी पुन्हा त्या नराधमाने मुलीला दुसऱ्या एका हॉटेलवर नेत तिच्यावर दुसऱ्यांदा अत्याचार केला.
गेल्या काही दिवसांपासून पीडित मुलीला पोटदुखीचा त्रास होत होता. त्यामुळे तिला जळगाव येथील जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तिथे डॉक्टरांनी तिची तपासणी केली असता, ती पाच महिन्यांची गर्भवती असल्याचे धक्कादायक प्रकार उघडकीस आला. मुलीच्या आईने तात्काळ पारोळा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार संशयित ह्यसोनूह्ण (पूर्ण नाव व गाव माहीत नाही) याच्यावर पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश महाजन हे करत आहेत.
