जळगाव मिरर / २८ फेब्रुवारी २०२३ ।
उद्यापासून मार्च महिना सुरु होत आहे महिन्याच्या सुरुवातीलाच सरकारकडून काही नियम बदलले जातात, त्याचा थेट परिणाम आपल्या खिशावर होतो. यावेळी देखील 2000 रुपयांची नोट, एलपीजीची किंमत आणि ट्रेनच्या वेळापत्रकात महत्त्वाचे बदल होणार आहेत. आज आपण याच बदलांविषयी सविस्तर जाणून घेणार आहोत.
1 मार्चपासून ग्राहकांना इंडियन बँकेच्या एटीएममधून 2,000रुपयांच्या नोटा मिळणार नाहीत. यासाठी ग्राहकांना बँकेच्या शाखेत जावे लागेल. या निर्णयामागील कारण स्पष्ट करताना बँकेने सांगितले की, एटीएममधून 2000 रुपयांची नोट काढल्यानंतर ग्राहक शाखेत येतात आणि त्याचे सुट्टे घेतात. हे थांबवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
एलपीजीच्या किंमतीमध्ये महिन्याच्या सुरुवातीला तेल वितरण कंपन्या बदल करतात. मात्र, गेल्या वेळी यामध्ये कोणताही बदल झालेला नाही. सध्या, 14.2 किलोच्या घरगुती एलपीजी सिलेंडरची किंमत दिल्लीत 1053 रुपये, कोलकात्यात 1079 रुपये, मुंबईत 1052.50 रुपये आणि चेन्नईमध्ये 1068.50 रुपये आहे. मात्र यंदा या किंमती बदलू शकतात असा अंदाज आहे.
मार्चमध्ये होळीचा सण उत्साहात साजरा केला जाणार आहे. हे लक्षात घेऊन भारतीय रेल्वेने 1 मार्चपासून अनेक विशेष गाड्या सुरू करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे महानगरांमध्ये काम करणाऱ्या लोकांना त्यांच्या घरी जाण्याची खूप सोय होणार आहे. रेल्वेने विविध मार्गांवर विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या गाड्या दिल्ली, मध्य प्रदेश, मुंबईसह अनेक मार्गांदरम्यान धावतील. यामध्ये काही गाड्या सुरू झाल्या आहेत. त्याच वेळी, काही गाड्या 1 मार्च 2023 पासून सुरू होतील. होळी, नवरात्री असे अनेक मोठे सण मार्च महिन्यात येतात. त्यामुळे मार्चमध्ये 12 दिवस बँका बंद राहतील. अशा परिस्थितीत, जर तुम्ही बँकेशी संबंधित कोणतेही काम बऱ्याच काळापासून पुढे ढकलत असाल तर ते त्वरित पूर्ण करुन घ्या.
