जळगाव मिरर । १ जानेवारी २०२३
आजपासून नवीन वर्ष सुरु झाले आहे. तर काही कंपन्या आपला वार्षिक अहवाल काढीत असतात अशाच एका कंपनीने आपला वार्षिक अहवाल काढला व त्यात एका व्यक्तीने तब्बल २८ लाख रुपयांचे जेवण केले असल्याची बाब समोर आली आहे. हि घटना पुण्यात घडली आहे.
पुण्याच्या एका ग्राहकाने वर्षभरात २८ लाख रुपये झोमॅटोवरुन जेवण ऑर्डर करण्यासाठी खर्च केले. झोमॅटोने जाहीर केलेल्या वर्षभराच्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे. तेजस असं या ग्राहकाचं नाव आहे. त्यासोबतच ग्राहकांनी यावर्षी मोठ्या प्रमाणात खर्च केला आहे. त्यात एकाने एकाच ऑर्डरमध्ये २५ हजार रुपयांपेक्षा जास्त किमतीचे पिझ्झा ऑर्डर केले, असंही या अहवालातून समोर आलं आहे.
झोमॅटोच्या 2022 ट्रेंड रिपोर्टनुसार, बिर्याणी हा सर्वात आवडता खाद्य पदार्थ होता. 2022 मध्ये झोमॅटोच्या ग्राहकांनी प्रत्येक मिनिटाला 186 बिर्याणीची ऑर्डर दिली. स्विगीवरही हा सर्वाधिक ऑर्डर केलेला पदार्थ होता, असं त्यांनी दावा केला होता. त्यानंतर या वर्षी झोमॅटोवर दुसरा सर्वात लोकप्रिय खाद्यपदार्थ पिझ्झा होता. 2022 मध्ये पिझ्झा प्रेमींनी दर मिनिटाला 139 ऑर्डर केले आहे. रविवारी झोमॅटोवर अनेक ऑफर्स असतात. या ऑफर्सचा अनेकांनी लाभ घेतला आहे. त्यात एकूण 6 लाख रुपयांची बचत केली आहे.
