जळगाव मिरर | २८ ऑगस्ट २०२३
देशातील जम्मूच्या कठुआ जिल्ह्यातील एका विद्यार्थ्याने फळ्यावर जय श्रीराम लिहिले. यावरून शिक्षकाने त्याला आहे. मारहाण केली. कठुआ जिल्ह्यात शिक्षक आणि मुख्याध्यापकाच्या विरोधात निदर्शने झाली. सध्या पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
शाळेचे मुख्याध्यापक मोहम्मद हाफीज आणि शिक्षक फारुख अहमद यांच्याविरोधात विविध कलमांन्वये एफआयआर दाखल करण्यात आला आहे. संतापलेल्या शिक्षकाने मुलाला इतके मारले की त्याला रुग्णालयात दाखल करावे लागले. या प्रकरणाची माहिती देताना पोलिसांनी सांगितले की पीडित विद्यार्थ्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.