
जळगाव मिरर | १ डिसेंबर २०२५
केंद्र शासनाच्या खेलो इंडिया उपक्रमाअंतर्गत केंद्र शासन, भारतीय क्रीडा प्राधिकरण (SAI) आणि भारतीय ॲथलेटिक्स महासंघ (AFI) यांच्या संयुक्त विद्यमाने जळगाव जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशन व भुसावळ तालुका ॲथलेटिक्स असोसिएशन आयोजित अस्मिता लिग ॲथलेटिक्स स्पर्धेचे आयोजन रेल्वे स्पोर्ट्स ग्राउंड भुसावळ येथे करण्यात आले होते.
स्पर्धेचे उद्घाटन पोलीस उपअधीक्षक श्री. संदिप गावित यांचे हस्ते क्रीडा ज्योत प्रज्वलित करून करण्यात आले याप्रसंगी महाराष्ट्र राज्य ॲथलेटिक्स असोसिएशनचे उपाध्यक्ष राजेश जाधव, जिल्हा युवा शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघाचे सचिव प्रा.हरीश शेळके, जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनचे उपाध्यक्ष प्रा. इकबाल मिर्झा, तांत्रिक समिती प्रमुख गिरीश पाटील, भुसावळ तालुका ॲथलेटिक्स असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकांत निकम, कार्याध्यक्ष गोपिसिंग राजपूत, सचिव रविंद्र चोपडे,राष्ट्रीय कबड्डी खेळाडू नयनसागर मणी यांची उपस्थिती होती.
स्पर्धेचे प्रास्ताविक राजेश जाधव यांनी केले जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनच्या राष्ट्रीय खेळाडू लावण्या तायडे, श्रेया गव्हाले, अनुत्रा गुरचळ, आर्या काळे,तेजल पाटील यांनी क्रीडा ज्योत मैदानात आणली त्यावरून मुख्य क्रीडा ज्योत प्रज्वलित करून स्पर्धेचे विधिवत उद्घाटन करण्यात आले याप्रसंगी आकाशात रंगी बेरंगी फुगे सोडण्यात आले स्पर्धेचे आधी सर्व खेळाडूंचा वारमाप म्हणून सौ.पारुल वर्मा व आदिती घाटे यांनी झुंबा डान्स करून घेतला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.कांचन विसपुते यांनी तर आभारप्रदर्शन प्रा.समीर घोडेस्वार यांनी केले स्पर्धेचा निकाल याप्रमाणे.
१४ वयोगट मुली.
ट्रायथलॉन A ग्रुप.
१) सेजल कमलाकर मोरे.
२) भाग्यश्री विजय चांदणे
३) अनुत्रा मनीष गुरचळ
ट्रायथलॉन B ग्रुप.
१) धनश्री विश्वास कोळी
२) वैष्णवी कृष्णा लोहार
३) पूजा भरत बारेला
ट्रायथलॉन C ग्रुप.
१) पूजा शामराव जाधव
२) आर्या प्रशांत काळे
३) यज्ञा लखिंचद कोळी
किड्स जवेलियन.
१) हंसिका किशोर पाटील
२) हर्षाली श्रीकांत राठोड
३) हंसिका किशोर पाटील
१६ वयोगट मुली.
६० मीटर धावणे.
१) शीतल विजय चांदणे
२) मयुरी अनिल गायकवाड
३) अनन्या मनोज काळे
६०० मीटर धावणे.
१) नंदिनी प्रेमसिंग बारेला
२) अनन्या मनोज काळे
३) अनुष्का मोहन खडसे
थाळी फेक.
१) भाग्यश्री कौतिक पर्वते
२) नीलम रेवा बारेला
३) सहिमा मेहेरखान तडवी
गोळाफेक.
१) संस्कृती चंद्रकांत राऊत
२) विधी समाधान पाटील
३) हेतल घनशाम पाटील
भालाफेक.
१) हेतल घनशाम पाटील
२) संस्कृती चंद्रकांत राऊत
३) अश्विनी ज्ञानेश्वर कोळी
लांब उडी.
१) शीतल विजय चांदणे
२) खुशी शंकर पाटील
३) लावण्या महेश तायडे
उंच उडी.
१) नंदिनी प्रेमसिंग बारेला
२) दिव्या मेलसिंग बारेला
३) नीलम रेवा बारेला
स्पर्धेत पंच म्हणून योगेश सोनवणे, नितीन पाटील, प्रा. समीर घोडेस्वार, विजय विसपुते, जितेंद्र फिरके, धीरज जावळे, डॉ. कांचन विसपुते, ममता शर्मा, सुप्रिया पाटील, जितेंद्र शिंदे, डोंगरसिंग राजपूत, राहुल महाजन,सतीश चौधरी, पवन गावंडे, किरण पाटील, डॅनियल पवार,पंकज तिवारी, आदित्य पाटील, एश्वर्य वर्मा, हिरालाल गौर,योगेंद्र हरणे, नीलांबरी शिंदे, विष्णू सेन,मुकुल महाजन यांनी काम पाहिले स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी मध्य रेल्वेचे क्रीडा सचिव डिक्सन व भरत वाघ व भुसावळ तालुका ॲथलेटिक्स असोसिएशनचे पदाधिकारी सदस्य व खेळाडू यांचे मोलाचे सहकार्य लाभले






















