जळगाव मिरर | ५ ऑगस्ट २०२४
महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेचे राज्य सचिव श्री अमोल भिसे यांच्या हस्ते जळगाव जिल्ह्यातील पदाधिकारीच्या नियुक्त्या करण्यात आल्या.
यात जळगाव तालुका अध्यक्ष प्रदीप पाटील जळगाव तालुका उपाध्यक्ष देवेंद्र माळी जळगाव तालुका सचिव मनोज लोहार जळगाव तालुका संघटक विलास सोनार जळगाव शहर सचिव हर्षल वाणी एरंडोल तालुका संघटक शुभम माळी एरंडोल तालुका सचिव देवानंद घुले यांच्या नियुक्त्या महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेचे राज्य सचिव अमोल भिसे साहेब यांच्या हस्ते करण्यात आल्या. जळगाव जिल्ह्यातील केळी पिक विमा,केळीला फळाचा दर्जा मिळावा, हमीभाव योग्य प्रमाणात मिळावा,शेतकऱ्यांसाठी जोडव्यवसाय करण्यासाठी शेतकऱ्यांना योजनाचा लाभ मिळवुन देण्यासाठी आमचा पक्ष काम करणार आहे , असे मार्गदर्शन राज्य सचिव अमोल भिसे यांनी केले.
महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेच्या बैठकीत ग्रामीण जिल्हा अध्यक्ष मुकुंदा रोटे, जनहित कक्षाचे राज्य उपाध्यक्ष चेतन अढळकर, महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेचे जळगाव जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील, जनहित कक्षाचे संदिप मांडोळे, निलेश खैरनार, कमलाकर पाटील इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.