
जळगाव मिरर / १३ मार्च २०२३ ।
जळगाव शहर व तालुका कुस्तीगीर संघ यांच्या वतीने दिनांक १२ रविवार रोजी कुमार वजनी गटातील कुस्ती स्पर्धा छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल येथे संपन्न झाल्या स्पर्धेचे उद्घाटन जळगाव शहराचे आमदार सुरेश भोळे (राजू मामा) यांच्या हस्ते झाले.
या प्रसंगी कुस्तीगीर अध्यक्ष डॉ.शांताराम सोनवणे , क्रीडा अधिकारी जगदीश चौधरी , कुस्तीगीर सचिव दिलीप घुले , सहसचिव दत्तू भामरे पहिलवान, तांत्रिक सचिव राहुल वाघ , बापूसाहेब पाटील , विजय वाडकर , सुनिल शिंदे , याकूब पैलवान , अखिल पैलवान , बाळा सपकाळे , नितीन गवळी , मुन्ना पैलवान यांच्यासह मल्ल उपस्थित होते. सदर स्पर्धेतील विजयी स्पर्धक चाळीसगाव येथे होणाऱ्या जिल्हा निवड चाचणी होऊन पुढील नियोजित शहरात ४३ व्या कुमार राज्यस्तरीय अजिंक्यपद स्पर्धेसाठी खेळणार आहे.
पुढील प्रमाणे गट निकाल पै रोहन गवळी (४५ कि.), पै यश गवळी (४८), पै रितेश पिसाळ (५५), पै धीरज गवळी (६०), पै झुकरेल खान (६५), पै हर्षित झेंडे (७१), पै पार्थ पाटील (८०), यास्पर्धे साठी पंच म्हणून दिलीप घुले , दत्तू भामरे गुणलेखक राहुल वाघ , वेळ अधिकारी कल्पेश मराठे यांनी स्पर्धेसाठी काम पाहिले.




















