जळगाव मिरर | ६ ऑगस्ट २०२३
जळगाव जिल्ह्यातील भडगाव तालुक्यात एका सात वर्षे अल्पवयीन मुलीला अत्याचार करून ठार केल्याची घटना ताजी असताना पारोळ्या तालुक्यातील देखील एका १६ वर्षीय मुलीला लव्हशिप कर अन्यथा ठार मारेल अशी धमकी देणार विरोधात पारोळा पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पारोळा तालुक्यातील एका गावातील रहिवासी असलेली 16 वर्षीय अल्पवयीन मुलगी शिक्षणासाठी पारोळा शहरात येत असते दिनांक ४ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास पारोळा शहरातील बस स्थानकाच्या पाठीमागील बोगद्याजवळ रोडवर उंदीर खेडा गावातील बस स्थानक तसेच फिर्यादीच्या घरासमोर वेळोवेळी संशयित आरोपीने सोळा वर्षी अल्पवयीन मुलीस तिचा पाठलाग करीत उजवा हात धरून तू मला आवडतेस तू माझ्यासोबत लवशिप कर असे बोलून तिच्या मनात लज्जा उत्पन्न होऊन तू जर माझ्यासोबत लवशिप केली नाही तर मी तुला स्वतःला जीवानिशी ठार करेल अशी धमकी दिली त्यामुळे अल्पवयीन मुलीचे वडिलांनी त्याला समजाविण्यासाठी गेले असता त्यांनी अल्पवयीन मुलीच्या वडिलांना देखील शिवीगाळ करून अश्लील हावभाव करून तू जाने जे होईल ते करून घे अशी धमकी दिली या प्रकरणी अल्पवयीन मुलीने पारोळा पोलीस स्थानकात धाव घेत संशयित आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राजू जाधव हे करीत आहे.