जळगाव मिरर | ३० जून २०२३
जळगाव शहरासह परिसरात होत असलेल्या अवैध वाळू उत्खननावर आता तालुका पोलीस चांगलेच ॲक्शन मोड मध्ये एकाच दिवशी तब्बल तीन ट्रॅक्टर वर कारवाई करीत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जळगाव शहर परिसरात असलेल्या खेळी आव्हाने या गावातील नदीपात्रातून होत असलेल्या अवैध वाढू उत्खनावर जळगाव तालुका पोलिसांनी एकाच दिवसात तब्बल तीन ट्रॅक्टर पकडत पोलीस ॲक्शन मोड मध्ये आले असल्याचे कारवाई झाली आहे त्यामुळे वाळूमाफियांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. दि. २९ रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास शहरापासून जवळ असलेल्या आव्हाणा रोडवर सुमारे अर्धा ब्रास अवैध वाळूच्या ट्रॅक्टरमधून वाहतूक होत असल्याची माहिती तालुका पोलिसांना मिळताच. तालुका पोलीस स्थानकाचे पोकॉ.अभिषेक पाटील दिलेल्या फिर्यादीनुसार, १ हजार ५०० रुपये किमतीची अवैध वाळू ट्रॅक्टरमध्ये असतांना २ लाख रुपये किमतीचे ट्रॅक्टरसह ट्रॅक्टरचालक विक्की सोनवणे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला ताब्यात देखील घेतले आहे. पुढील तपास पोहेकॉ.विश्वनाथ गायकवाड हे करीत आहे तर दुसऱ्या घटनेत शहरातील आव्हाने फाट्यानजीक दि. २९ रोजी दुपारच्या सुमारास अवैध वाळू वाहतुकीचे ट्रॅक्टर अर्धाब्रास वाळू वाहतुक करीत असतांना २ लाख रुपये किमतीचे ट्रॅक्टरसह चालका विरोधात पोहेकॉ.विश्वनाथ गायकवाड यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार संशयित आरोपी योगेश अकोलकर याच्यासह ट्रॅक्टर मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोहेकॉ.गुलाब माळी हे करीत आहे.
तर तिसऱ्या घटनेत दि.२९ रोजी सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास जळगाव शहरातून जवळ असलेल्या खेडी फाट्याजवळील मुख्य रस्त्यावर पोकॉ.रफिक तडवी यांच्या फिर्यादीवरून गणेश भिल व ट्रॅक्टर मालक अशा दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोहेकॉ.दिनेश पाटील हे करीत आहे.