जळगाव मिरर | २३ जुलै २०२५
CBSE दिल्लीच्या वतीने आयोजित “क्लस्टर कबड्डी स्पर्धा २०२५” या राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन काशिनाथ पलोड पब्लिक स्कूल, जळगाव येथे दिनांक २६ ते २८ जुलै २०२५ दरम्यान करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर डॉ. अविनाश आचार्य विद्यालय सुयोग कॉलनी येथे पत्रकार परिषद घेण्यात आली.
या पत्रकार परिषदेत विवेकानंद प्रतिष्ठानच्या उपाध्यक्षा सौ. हेमलता अमळकर ,सचिव श्री.विनोद पाटील , प्रशासकीय अधिकारी श्री. दिनेश ठाकरे, शाळेचे प्राचार्य श्री . प्रविण सोनावणे . शाळेच्या समन्वयिका सौ . स्वाती अहिरराव,सौ. अनघा सागडे, क्रीडा शिक्षक सौ . मंजुषा भिडे, श्री अजय काशीद व आयोजक समितीचे सदस्य उपस्थित होते. या परिषदेमध्ये स्पर्धेच्या आयोजनाची सविस्तर माहिती देण्यात आली असून यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील व काही सीमावर्ती राज्यांतील CBSE शाळांचे ६३कबड्डी चे संघ सहभागी होणार आहेत.
उद्घाटन समारंभ २६ जुलै रोजी सकाळी १० वाजता, तर बक्षीस वितरण व समारोप २८ जुलै रोजी दुपारी ३ वाजता होणार असून , उद्घाटन समारंभासाठी जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री मा . श्री .गुलाबराव पाटील उपस्थित राहणार आहेत .
या शिवाय दोन्ही कार्यक्रमांसाठी जिल्ह्यातील मान्यवर, शासकीय अधिकारी व क्रीडाक्षेत्रातील व्यक्तींची उपस्थिती राहणार आहेत.उद्घाटनाच्या दिवशी सकाळी सात वाजता जीएस ग्राउंड ते सागर पार्क या मार्गावरून सहभागी खेळाडूंची रॅली काढण्यात येणार आहे .2025 हे वर्ष काशिनाथ पलोड शाळेचे रौप्य महोत्सवी वर्ष असून शाश्वत २५ या नावाने संपूर्ण वर्षभर विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे आणि त्यातच सीबीएसई कडून या स्पर्धेचे आयोजन करण्याची संधी शाळेला मिळाल्याने शाळेच्या प्रतिष्ठेत एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
ही स्पर्धा विद्यार्थ्यांमध्ये शारीरिक क्षमता, शिस्त, नेतृत्वगुण आणि राष्ट्रीय एकात्मतेचा विकास घडवणारी ठरणार आहे, असे प्राचार्यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेमध्ये जळगावातील सर्व प्रतिष्ठित वर्तमानपत्रे व वाहिन्यांच्या पत्रकारांची उपस्थिती होती.
