जळगाव मिरर | २ नोव्हेबर २०२४
ग्रामदैवत श्रीराम मंदिर जळगाव, संस्थानचा श्रीराम स्थवहनोत्सवाला शनिवार, २ नोव्हेंबरपासून प्रारंभ होत आहे. या ११ दिवसीय रथोत्सवानिमित्त घोडा (अश्व), हत्ती (ऐरावत), वाघ, सिंह, सरस्वती, चंद्र, सूर्यनारायण, गरुडराज, मारुती, रासक्रीडा अशी १० वहने शहरातील विविध भागात निघतील. तसेच वहनांच्या मार्गावर पानसुपारी (आमंत्रण) चे कार्यक्रम होणार आहे.
उत्सव काळात श्रीराम मंदिरात दररोज पहाटे काकड आरती, पूजा अभिषेक, ७ वाजता मंगल आरती, काकड भजन, दुपारी ४ ते सायंकाळी ५ पर्यंत श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचा हरिपाठ त्यानंतर भजन, पूजा व आरती होईल. त्यानंतर सायंकाळी ७ वाजता श्रीराम मंदिरातून वहन व दिंडी निघेल.
जलग्रामोत्सव श्रीराम रथोत्सवाला १५१ वर्षे पूर्ण झाली आहे. या रथोत्सवाला शनिवार, २ ते १२ नोव्हेंबरपर्यंत रथोत्सव असणार असून १० दिवस वहनोत्सव असून १२ नोव्हेंबरला श्रीराम रथयात्रा होणार आहे. यात २ ते १२ नोव्हेंबर दरम्यान ज्या ठिकाणी रथ जाऊ शकत नाही, त्या भागात वहन नेले जाणार आहे.