जळगाव मिरर / २० मार्च २०२३
हिंदू धर्माचे नववर्ष हे गुढीपाडव्यापासून सुरुवात होत असते या दिवसाचे राज्यात मोठ्या धुमधडाक्यात स्वागत करून हा दिवस साजरा केला जात असतो. त्याच प्रकारे जळगाव शहरातही मोठ्या उत्साहात नववर्षाचे स्वागतासाठी संस्कार भारतीतर्फे भव्य रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. संस्कार भारती जळगांव समितीतर्फे नविन वर्षानिमित्त जळगांव शहरातील सर्व रांगोळी कलाकार व महिलांसाठी आपली कला सादर करण्याची एक सुवर्ण संधी घेवून येत आहे.
संस्कार भारतीची रांगोळी स्पर्धा – स्पर्धेचे नियम व अटी
या स्पर्धेत मुलं-मुली, महिला-पुरुष कोणीही सहभागी होवू शकतात, रांगोळी कुठल्याही प्रकारची काढू शकतात फक्त रांगोळीत किंवा रांगोळी बाहेर संस्कार भारती नाव लिहिणे आवश्यक आहे, रांगोळी कमीत कमी 6 फूट 6 फूट असावी या व्यतिरिक्त संस्कार भारती नाव असले तरी चालेल, रांगोळी काढणारे कलाकार हे दोन किंवा दोनपेक्षा जास्त असावेत, रांगोळी आपआपल्या परिसरातील मंदिरात किंवा मंदिर परिसराबाहेर काढावी, रांगोळीसाठी कुठल्याही विषयांचे किंवा वेळेचे बंधन नाही. परंतु गुढीपाडव्याला सकाळी 9.00 वाजतेपर्यंत काढून पूर्ण व्हावी, रांगोळीचा फोटो मंदिर परिसराचा पत्ता व कालाकारांसोबत रांगोळीचा एक फोटो, पाडव्याच्या दिवशी सकाळी 9 ते 10 या वेळेत खालील दिलेल्या
मोबाईल नंबरवर पाठवावा. परिक्षण हे 10 वाजेनंतर सुरु होईल. संस्कार भारतीचे कला सादक परिक्षणासाठी येतील. यासाठी नाव नोंदणी खालील दिलेल्या मोबाईल नंबरवर 20 मार्च पर्यंत करावी.
प्रथम पारितोषीक -3000/- रु., द्वितीय पारितोषीक- 2000/-रु, तृतीय पारितोषीक- 1000/- रु., उत्तेजनार्थ पारितोषीक 1 – 500/- रु. उत्तेजनार्थ पारितोषीक 2 – 500/- रु.
चला तर मग या स्पर्धेत भाग घेवून सुंदर सुंदर रांगोळ्या काढून नविन वर्षाचे स्वागत करु या आणि आपल्या परिसरातील मंदिरात आपली सेवा अर्पण करु या.
नांवनोंदणीसाठी रिंगरोड परिसरासाठी सौ. गीता रावतोळे मो. 9422282971, गणेश कॉलनी परिसर सौ. रेखा लढे मो. 8766878228, गिरणा टाकी परिसर सौ. संगिता पिंगळे – मो. 9423708337, दादावाडी परिसर सौ. वर्षा बऱ्हाटे – मो. 9403905809, मुक्ताईनगर, प्रेमनगर परिसर सौ. शारदा सावदेकर मो. 7875202511, महाबळ परिसर सौ.वैशाली पाटील- मो. 9420350171, बळीरामपेठ, जुने जळगाव परिसर सौ. प्रतिभा नेवे- मो. 9403569339 यांच्याकडे नांवनोंदणी करावी असे आवाहन करण्यात आले आहे.