जळगाव मिरर | ६ जून २०२३
हरित क्रांतिचे प्रणेते, आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार कै.वसंतरावजी नाईक (मा.मुख्यमंत्री म. रा.) यांची 1 जुलै 2023 रोजी 111वी जयंती सार्वजनिक रित्या साजरी करण्या संदर्भात दि. ४ जून रोजी अजिंठा विश्राम गृह जळगाव येथे कै. वसंतरावजी नाईक जयंती महोत्सव समिति यांच्या वतीने सह विचार सभा आयोजित करण्यात आली.

या सभेत श्री.बी.बी.धाडी (सर), आत्माराम जाधव, सुभाष जाधव , रोहीदास पवार, प्रा.गजानन जाधव यांनी विचार मांडले. त्या नंतर नितिन जाधव यांनी जयंती करिता लागणारा आर्थिक आराखडा सादर केला त्यास सर्वानुमते अनुमती देण्यात आली. सर्वानुमते जयंती यशस्वी करण्यासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. या प्रसंगी दया राठोड, गजानन चव्हाण, मदन राठोड, अशोक राठोड, निलेश चव्हाण, अभिजीत चव्हाण, अनिल राठोड व सर्वच संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.




















