जळगाव मिरर | १९ फेब्रुवारी २०२६
कंजरभाट समाज युवा फाउंडेशन तर्फे आज छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त कोर्ट चौक येथील महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यास तसेच राजमुद्रा प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
या प्रसंगी संस्थेचे मुख्य सल्लागार मोहन गारुंगे, सचिव राहुल नेतलेकर, खजिनदार योगेश बागडे, उमेश माछरेकर, संदीप गारुंगे, वीर दहियेकर, गणेश बागडे, कार्तिक बाटूंगे, नमन गारुंगे, जितू नेतले तसेच इतर समाजबांधव उपस्थित होते.
यावेळी उपस्थितांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्य, पराक्रम आणि हिंदवी स्वराज्याच्या विचारांचे स्मरण करून त्यांच्या कार्यास अभिवादन केले. कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.




















