
जळगाव मिरर | २८ ऑगस्ट २०२५
‘गणपती बाप्पा मोरया’चा जयघोष, ढोलताशांचा गजर, ‘आला आला माझा गणराज आला’ यासह वेगवेगळी गणपतीची गाणी व उत्साह, चैतन्य तसेच भक्तीमय वातावरणात लाडक्या बाप्पांचे बुधवारी (२७ ऑगस्ट) घरोघरी व मंडळांमध्ये आगमन झाले. घरोघरी सकाळपासून दुपारपर्यंत गणरायाची स्थापना करण्यात आली तर मंडळांच्या वतीने वाजत गाजत गणरायाची आगमन मिरवणूक काढत रात्रीपर्यंत स्थापना करण्यात आली.
बुधवारी मोठ्या भक्तीमय वातावरणात गणेशोत्सवाला सुरुवात झाली. घरोघरी तसेच विविध मंडळांच्या ठिकाणी गणरायाची स्थापना करण्यात आली. यासाठी मंगळवारपाठोपाठ बुधवारी सकाळपासूनच गणेशभक्तांची बाजारात मूर्ती, पूजेचे साहित्य घेण्यासाठी गर्दी झाली होती. स्थापनेसाठी पहाटेपासून दुपारी १:५३ वाजेपर्यंत असलेला मुहूर्त अनेकांनी साधत घरोघरी अत्यंत भक्तीमय वातावरणात गणरायाची स्थापना केली. मंडळातर्फे ढोल-ताशांच्या गजरात गणरायाची आगमन मिरवणूक काढण्यात आली. काही मंडळांनी बॅन्जो लावून उत्साह द्विगुणित केला. ढोल-ताशा, लेझीम पथक तसेच बँन्त्रोच्या तालावर मंडळाच्या कार्यकर्त्यांनी नाचत बाप्पांचे स्वागत केले.
‘खड़के चाळच्या महाराजा’ने वेधले जळगावकरांचे लक्ष !
शहरातील छत्रपती शिवाजी नगर परिसरातील खड़के चाळीतील श्री गुरूदत्त उत्सव समिती मित्र मंडळाच्या ‘खड़के चाळच्या महाराजा’ला टॉवर चौकात दहीहंडीच्या श्री कृष्ण गोविंदा पथकाने पाच थर रचून सलामी दिली होती. शहरातून निघालेल्या ‘खड़के चाळच्या महाराजा’ने जळगावकरांचे लक्ष वेधून घेतले होते. गणेशोत्सवातील दहाच्या दहा दिवस भरगच्च धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे नियोजन मंडळाने केलेले आहे.त्यात प्रामुख्याने 11,111 दिव्यांची महाआरती,किर्तन,150 सदस्यांकडून सामूहिक गणपती अथर्वशीर्ष पठण,विसर्जन मिरवणुकीतील पारंपरिक लेझीम पथक ही या वर्षीच्या गणेशोत्सवाची प्रमुख वैशिष्ट्ये असतील असे मंडळाच्या पदाधिकारी व सदस्यांनी कळविले आहे.
मंडळाची कार्यकारणी जाहीर – अध्यक्षपदी आकाश जाधव उपाध्यक्षपदी. दीपक झुंजारराव सेक्रेटरी.. योगेश सूर्यवंशी कार्याध्यक्ष.. ललित नन्नवरे खजिनदार. मनोज तिळवणे सह खजिनदार.. गणेश ठाकूर संचालक… आनंद शिरसाळे सहसंचालक.. मनोज पाटील
संघटक.. कल्पेश शिंदे सहसंघटक..मंगेश लोखंडे कायदेशीर सल्लागार.. राजेंद्र सूर्यवंशी . संजय नन्नवरे .उत्तम कोळी.. अनिल पाटिल..संदीप पाटील प्रमुख सल्लागार.. राधेश्याम चौधरी . भाग्यवंत पाटील.. महेश सूर्यवंशी. यश ठाकरे. शुभम पाटील . पवन शेवाळे बंटी पाटील … पवन निंबा पाटील, शैलेश नाना पाटील, दीपक बारी, पवन बारी, आकाश बाविस्कर




















