चोपडा : प्रतिनिधी
संपूर्ण राज्यभरात श्री गणेश उत्सवाचे मोठ्या आनंद व उत्साहाने-भक्तीभावाने आयोजन सुरु आहे. चोपडा शहरातील पाचव्या दिवशी श्री गणेश मूर्ती विसर्जन मिरवणूक कार्यक्रमासाठी चोपडा शहरातील उपस्थित सर्व गणेश मंडळाचा खा.रक्षाताई खडसे यांच्या स्ते सन्मान व सत्कार करण्यात आला. हा कार्यक्रम चोपडा तालुका भारतीय जनता पार्टी आयोजन करण्यात आले होते. यावेळी शहरातील श्री गणेश मंडळांतील पदाधिकार्यांचा स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र व पुष्पगुच्छ देवून सत्कार, सन्मान करण्यात आला.
यावेळी तालुकाध्यक्ष पंकज पाटील, शहराध्यक्ष गजेंद्र जैसवाल, जिल्हाउपाध्यक्ष राकेश पाटील, व्यापारी आघाडी जिल्हा उपाध्यक्ष रविंद्र मराठे, रावेर महिला आघाडी अध्यक्षा रेखा बोंडे, भाजयुमो जिल्हा चिटणीस मनोज सनेर, भाजयुमो तालुकाध्यक्ष प्रकाश पाटील, चंद्रशेखरदादा पाटील, जेष्ठनेते अॅड.एस.डी. सोनवणे, पं.स.सदस्य भरत बाविस्कर, जिल्हा उपाध्यक्षा रंजनाताई नेवे, शहर उपाध्यक्षा अनिताताई नेवे, शहर उपाध्यक्षा वंदनाताई पाटील, भाजयुमो शहराध्यक्ष विशाल भोई, तालुका चिटणीस भरत सोनगिरे, विधानसभा सोशल मिडीया प्रमुख मिलिंद वाणी, भाजयुमो शहर उपाध्यक्ष आकाश नेवे, सुभाष पाटील, धिरज सुराणा, अमित तडवी, मिलिंद पाटील, तुषार पाठक आदि पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.