जळगाव शहरातील एका परिसरातून १४ वर्षीय मुलगा व मुलीला पळवून नेल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्थानकात अनोळखी आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील सिंधी कॉलनी परिसरात दि.२८ रोजी एकाच वर्गात शिक्षण घेणाऱ्या १४ वर्षीय मुलगा व मुलगी घराजवळ असतांना अनोळखी व्यक्तीने अद्यात कारणाने काही तरी फूस लावून पळवून नेल्याची घटना घडली आहे. हि बाब परिवारातील सदस्यांना समजली असता त्यांनी परिसरात शोध घेतला असता ते मिळून न आल्याने त्यांनी लागलीच एमआयडीसी पोलिसात धाव घेत अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दीपक जगदाळे हे करीत आहेत.