जळगाव मिरर | २१ ऑगस्ट २०२४
आपण समाजाचे देणे लागतो हा भाव कायम ठेवून कार्यरत व्यक्तींचा समाजासमोर आदर्श ठेवता येतो,असे प्रतिपादन युवा नेते धनंजय चौधरी यांनी केले.येथील माजी उपसरपंच विवेक ठाकरे यांच्या मातोश्री स्व. कलाबाई देवीदास ठाकरे यांच्या स्मरणार्थ गरीब विदयार्थ्यांना गणवेश वाटप कार्यक्रमात ते बोलत होते.
निंभोरा येथील स्टेशन रोड भागातील सौ.डी.आर.चौधरी माध्यमिक विद्यालयात आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे चेअरमन ज्ञानदेव गणपत नेमाडे हे होते. आपल्या पूर्वपरिस्थितीची कायम जाण ठेवून पुढे केलेला मदतीचा हात पुण्यकर्म असल्याच्या भावना मधुस्नेह संस्था परिवाराचे समन्वयक तसेच गावचे माजी उपसरपंच विवेक ठाकरे यांनी व्यक्त केल्या.व्यासपिठावर सरपंच सचिन महाले,तंटामुक्तीचे अध्यक्ष डिगंबर चौधरी,संस्थेचे संचालक सुधाकर पूना भंगाळे,प्रमोद भोगे,विवेक बोंडे,ग्रामपंचायत सदस्य मधुकर बिऱ्हाडे,सतिष अंबादास चौधरी,दस्तगीर खाटीक, स्वप्नील गिरडे,दिलशाद शेख,मनोहर तायडे,सलमान अमान खान,पत्रकार राजीव बोरसे,भास्कर महाले,सुनील कोंडे,प्रा.दिलीप सोनवणे, शकील खाटीक,हबीब खान आदी उपस्थित होते.
शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती एस.टी.खान यांनी प्रास्ताविक व नियोजन केले.उपशिक्षक नरेंद्र दोडके यांनी सूत्रसंचालन केले. चंद्रकांत देशमुख,हेमलता नेमाडे,उदय अवसरमल,गोकुळ भोई,सरफराज तडवी,श्रीमती हेमलता नेमाडे या सर्व शिक्षकांसह गौरव नेमाडे, मुकुंदा फालक व तुषार भंगाळे यांनी परिश्रम घेतले.