जळगाव मिरर | १४ ऑक्टोबर २०२३
गेल्या अनेक महिन्यापासून जळगाव शहरातील मनसे विद्यार्थी सेनेची कार्यकारिणी बरखास्त करण्यात आलेली होती. त्यावर आज मुंबई येथे मनविसेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांच्या हस्ते जिल्हाध्यक्ष व शहराध्यक्ष पदावर अनेक कार्यकर्त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यात जळगाव महानगराध्यक्षपदी कुणाल पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस कीर्ती कुमार शिंदे, विद्यार्थी सेनेचे संदीप पाचंगे, अखिल चित्रे यांची उपस्थिती होती.
नियुक्तीपत्रात म्हटले आहे कि, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या जळगाव महानगराध्यक्ष पदी कुणाल पवार यांची नेमणूक करण्यात येत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांनी आजवर मांडलेले विचार ध्यानात ठेवूनच आपल्याला पुढील वाटचाल करायची आहे. विद्यार्थी, पालक, शिक्षक तसेच शैक्षणिक संस्था यांना भेडसावणाऱ्या असंख्य प्रश्नांना आपल्याला सामोरं जावं लागणार आहे. त्यासाठी आपल्या पिढीसमोरील विविध शैक्षणिक आव्हानांचा समस्यांचा अभ्यास आणि प्रसंगी आंदोलनं करण्यासाठी तुम्ही सदैव सज्ज रहायलाच हवं. मला पूर्ण विश्वास आहे की, ‘महाराष्ट्रातील सर्वात प्रबळ आणि प्रभावी विद्यार्थी संघटना’ अशी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेची ओळख निर्माण करण्यासाठी माझ्यासोबत तुम्हीही झपाटून काम कराल. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेतील तुमच्या भावी वाटचालीला शुभेच्छा.
या निवडीबाबत कुणाल पवार यांच्यावर मनसे शहराध्यक्ष विनोद शिंदे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शुभेच्छाचा वर्षाव केला आहे.