जळगाव मिरर । २९ ऑक्टोबर २०२२
कॉंग्रेसची भारत जोडो यात्रा तेलंगणात जावून पोहचली आहे, या यात्रेचे जय्यत स्वागत करण्यात आले, या दौऱ्यात राहुल गांधी विविध क्षेत्रातील लोकांच्या भेटी घेत असून त्यांच्या समस्या जाणून घेत आहेत.
यादरम्यान वृद्ध महिलांपासून ते लहान मुलांपर्यंत त्यांना भेटण्यासाठी आणि प्रवासात सहभागी होण्यासाठी लोक येत आहेत. याचा व्हिडिओ-फोटो काँग्रेस पक्षाकडून वेळोवेळी शेअर केला जात आहे. आता शनिवारी राहुल गांधींचा आणखी एक व्हिडिओ समोर आलाय. यामध्ये राहुल गांधी तेलंगणातील आदिवासी समुदायाच्या सदस्यांसोबत नाचताना दिसत आहेत. आदिवासी समाजातील सदस्यांसोबत नाचतानाचा हा व्हिडिओ काँग्रेसनं आपल्या ट्विटरवर शेअर केलाय. या व्हिडिओत राहुल गांधी आदिवासी समाजातील महिलांसोबत (Tribal women) कोम्मू डान्स (Kummi Dance) करताना दिसत आहेत. यावेळी समाजातील लोकांनी राहुल गांधींना आदिवासी मुकुटही घातला आहे. या व्हिडिओलाही लोक खूप पसंत करत आहेत.
Our tribals are the repositories of our timeless cultures & diversity.
Enjoyed matching steps with the Kommu Koya tribal dancers. Their art expresses their values, which we must learn from and preserve. pic.twitter.com/CT9AykvyEY
— Rahul Gandhi (@RahulGandhi) October 29, 2022
राहुल गांधींनी आदिवासी समुदायातील सदस्यांसोबत नृत्य केल्याचा व्हिडिओ त्यांच्या ट्विटरवर शेअर केलाय. आपल्या ट्विटमध्ये त्यांनी लिहिलंय, आमचे आदिवासी बांधव संस्कृती आणि विविधतेचं भांडार आहेत. आज ‘कोमू कोया’ आदिवासी महिलांसोबत स्टेप बाय स्टेप डान्स करण्याची संधी मिळाली. आदिवासी समाजाची कला आणि संस्कृती जतन करण्याबरोबरच ते शिकलं पाहिजं, असं त्यांनी म्हटलंय.