जळगाव मिरर | ५ जुलै २०२४
राज्यातील महायुती सरकारचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस व ना.अजित पवार यांच्या मंत्रीमंडळाने पावसाळी अधिवेशनात राज्यातील प्रत्येक महिलेसाठी ‘मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना’ सुरु केली आहे. या निर्णयाचे जळगाव जिल्ह्यात देखील स्वागत करण्यात आले तर जळगाव शहराचे माजी उपमहापौर डॉ.अश्विन शांताराम सोनवणे यांनी आता शहरातील प्रत्येक महिलांना या योजनेचा लाभ मिळावा म्हणून प्रत्येक कॉलनी व परिसरात पोहचून प्रत्येक बहिणीचे ‘लाडकी बहिण योजनेसाठी’ अर्ज मोफत भरून घेणार आहे.
‘मुख्यमंत्री लाडकी बहिण’ योजना शहरातील प्रत्येक महिलेला लाभ मिळावा यासाठी माजी उपमहापौर डॉ.अश्विन शांताराम सोनवणे यांनी मोठी यंत्रणा स्वखर्चाने उभी करीत शहरातील प्रत्येक बहिणीला या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रत्येक परिसर व कॉलनीमध्ये अर्ज भरून घेण्याची सुविधा सुरु करीत आहे. यात दोन टप्पे करण्यात आले आहे. यात पहिल्या टप्प्यात दि.६ जुलै २०२४ रोजी पासून सुरु होत आहे.
पहिल्या टप्प्यात परिसर – दि.६ जुलै ते दि.९ जुलै २०२४
गणेश कॉलनी परिसर, खोटे नगर परिसर, हरी विठ्ठल नगर परिसर, अयोध्या नगर परिसर, रामेश्वर कॉलनी परिसर, या परिसरातील प्रमुख चौकात डॉ.अश्विन शांताराम सोनवणे यांच्या माध्यमातून मदत कक्ष उभा करण्यात येणार असून याठिकाणी सकाळी ९ वाजेपासून अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे.
महत्वाची लागणारी कागदपत्र
आधार कार्ड, मतदान कार्ड, केशरी किवा पिवळे रेशनकार्ड, बँक पासबुक, पासपोर्ट फोटो व मोबाईल नंबर
ज्या बहिणींना या योजनेचा अर्ज भरायचा असेल त्यांनी अनिल देशमुख 8329948484, आकाश पारधे 7249677779, राहुल गायकवाड 8421017078 यांच्याशी संपर्क करावा असे आवाहन माजी उपमहापौर डॉ.अश्विन शांताराम सोनवणे यांच्याकडून करण्यात आले आहे.