
जळगाव मिरर | ३० एप्रिल २०२५
जळगाव शहरातील विविध भागातून चोरीला गेलेल्या दुचाकी चोरुन नेणाऱ्या मयुर उर्फ गोट्या बाबूलाल साळुंखे व रामचंद उफे राम कमचंद भिल (दोन्ही रा. मन्यारखेडा) यांच्या एलसीबीने मुसक्या आवळल्या. त्यांच्याकडून चोरीच्या दोन दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत.
सविस्तर वृत्त असे कि, शहरातील पिंप्राळा परिसरातील पंकज सरदार राजपुत या युवकाची दुचाकी रेल्वे स्टेशन परिसरातून दि. १६ एप्रिल रोजी चोरीला गेली होती. तर अब्दुल फारुख अब्दुल खलील देशमुख (रा. फातीमा नगर) यांची दुचाकी बळीराम पेठ भागातून दि.१९ एप्रिल रोजी चोरीला गेली होती. याप्रकरणी शहर व रेल्वे जीआरपी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना या दुचाकी मयुर उर्फ गोट्या बाबूलाल साळुंखे व रामचंद उफे राम कमचंद भिल (दोन्ही रा. मन्यारखेडा) यांनी या दुचाकी चोरल्याची माहिती मिळाली. या दोघांना ताब्यात घेऊन, त्यांची चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्यांच्याकडून २ दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत.
दोन्ही संशयित आरोपींची यापुर्वी कोणताही गुन्हेगारी रेकॉर्ड नसताना मिळालेल्या गोपनिय माहीती वरुन हे गुन्हे उघडकीस आले आहेत. ही कारवाई स्थनिक गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक शरद बागल, विजयसिंग पाटील, अतुल वंजारी, राजेश मेढे, संजय हिवरकर, अक्रम शेख, विजय पाटील, हरीलाल पाटील, रणजित जाधव, राहुल महाजन, प्रदिप चौरे यांच्या पथकाने केली.




















