जळगाव मिरर / १६ एप्रिल २०२३ ।
जळगाव जिल्हा नेहमीच अवैध गुटख्याच्या कारवाईने चर्चेत येत असतो. त्यामुळे जिल्ह्यातील जनतेला गुटखा कारवाई हि आता मोठी कारवाई म्हणून काही विशेष वाटत नाही. नेहमी पोलीस प्रशासानातार्फे अवैध गुटखा माफियांवर कारवाई करीत असता अशीच एक कारवाई जामनेरमध्ये झाली आहे. यात तब्बल ३ लाख रुपयांचा गुटखा स्थानिक गुन्हे शाखेच्या जळगाव येथील पथकाने पकडला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव गुन्हे शाखेने गोपनीय माहितीच्या आधारे जामनेर शहरातील ओम शांती नगरातील नितीन सुरेशचंद सुराणा यांच्या घरातून सुमारे दोन लाख 95 हजारांचा गुटखा जप्त करण्यात आला. गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक किसनराव नजन पाटील यांना गुटख्याबाबत गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानंतर जळगावच्या पथकाने जामनेर शहरातील ओम शांती नगरातील नितीन सुराणा यांच्या घरावर छापा टाकला. यात घरात दोन लाख ९५ हजार रुपये किंमतीचा गुटखा जप्त करण्यात आला. याबाबत नितीन सुरेशचंद सुराणा यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखा उपनिरीक्षक अमोल देवडे, भगवान पाटील, नंदलाल पाटील, उपाली खरे व भारत पाटील यांच्या पथकाने केली आहे.



















