जळगाव मिरर | २७ डिसेंबर २०२३
जळगाव जिल्ह्यातील काही ग्रामीण भागात बिबट्याची दहशत कायम असून नुकतेच वर्षाच्या अखेरीस नाताळच्या दिवशी बिबट्याने मध्यरात्री हल्ला करीत १७ बकऱ्यांचा फडशा पाडत थर्टी फर्स्टची पार्टी केली आहे. हि घटना दि.२५ सोमवार रोजी रात्रीच्या सुमारास चाळीसगाव तालुक्यातील वाकडी व पातोंडा शिवारात शेतातील शेडमध्ये घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शेतकरी मंगळवारी सकाळी शेतात गेल्यावर हा प्रकार समोर आला. यामुळे शेतकऱ्याचे सुमारे दीड ते पावणेदोन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून शेतकरी व शेतमजूर भयभीत झाले आहेत. वन विभागाने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. वाकडी, ता. चाळीसगाव येथील शेतकरी गोरख बळीराम पाटील यांच्या पातोंडा शिवारातील गट क्रमांक १५५ मधील शेतातील शेडमध्ये १७ बकऱ्या बांधलेल्या होत्या. या शेडला जाळी लावलेली होती.
एकीकडे अपुऱ्या पावसामुळे खरीप हंगामाचे नुकसान झाले असून उत्पन्नात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. अशात हिंस्त्र प्राण्यांकडून पशुधनावर हल्ले सुरूच असल्याने शेतकरी मेटाकुटीस आले आहेत