अमळनेर : विक्की उत्तम जाधव
येथील प्रताप महाविद्यालयात ग्रंथालय विभागाच्या वतीने कै.एस आर. रंगनाथन यांच्या जयंती निमित्ताने आर. के. बंगाली ग्रंथालयातर्फ प्रतिमा पूजन करून अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी संस्थेचे चिटणीस तथा प्राचार्य डॉ. ए.बी. जैन सहसचिव डॉ धीरज वैष्णव, उपप्राचार्य डॉ. जी. एच. निकुंभ, उपप्राचार्य प्रा. पराग पाटील, ग्रंथालय व इतिहास विभाग प्रमुख प्रा. डॉ. धनंजय आर चौधरी, ग्रंथपाल प्रा. डी आर. पाटील, डॉ नीलेश पवार, डॉ. जे. बी पाटील, क्रीडा संचालक डॉ सचिन पाटील, प्रा.अमित शिंदे, प्रा. अमृतलाल अग्रवाल, कुलसचिव आबासाहेब मैराळे, कार्यालयीन अधीक्षक राकेश निळे, देवेंद्र कांबळे, विजय ठाकरे, भटू चौधरी, धनराज मोरे, योगेश बोरसे, अजय साटोटे, तुषार पाटील, महेश राजपूत, दुर्योधन नेरकर ,संदेश शर्मा, विनोद कोठावदे, उमाकांत ठाकूर, कमलाकर पाटील, कैलास सैंदाणे, कैलास पाटील, गौरव पाटील, काशिनाथ एस ठाकूर, ओमगिरी गोसावी, सुनिलदत्त बिऱ्हाडे, चंद्रकांत ठाकूर, तृषाल पाटील व इतर विभाग प्रमुख, प्राध्यापक, कार्यालय कर्मचारी, विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी प्रतिमा पूजन करून उपस्थिती दिली. या ग्रंथालय दिनाचे औचित्य साधून ग्रंथालय सप्ताह निमित्त पुढील काळात ग्रंथालयाच्या तर्फे महाविद्यालयाच्या सर्व शाखांच्या विविध विभागातील विभाग प्रमुख, प्राध्यापक, उपस्थित होते. विद्यार्थ्यांना ग्रंथालय भेटीतून ग्रंथालयाचे दैनंदिन कामकाज-नियोजन व व्यवस्थापन, एकूणच पुस्तके, मांडणी, मासिक, वृत्तपत्र, नियतकालिके, पुस्तक देवाण – घेवाण, ऑनलाईन सुविधा व प्रक्रिया, संशोधन विभाग संदर्भ साहित्य इ. बाबत महत्वाची माहिती दिली जाणार आहे. या सर्व कामात ग्रंथालय विभागाचे कर्मचारी, सामान्य ज्ञान व स्पर्धा परीक्षा विभाग प्रमुख डॉ. विजय तुंटे, दिलीप शिरसाठ, मेहुल भाऊ यांचे सहकार्य मिळणार आहे.