• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home सामाजिक

भगवान् श्रीदत्तात्रेयांचा जन्मोत्सव !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
December 7, 2022
in सामाजिक
0
भगवान् श्रीदत्तात्रेयांचा जन्मोत्सव !
Share on FacebookShare on Twitter

संत सदगुरू सखाराम महाराज संस्थान अमळनेर येथे दत्त जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम आयोजित.  सकाळी होणार विविध कार्यक्रम दत्ताला लघु रुद्राचा अभिषेक सायंकाळी सुर्यस्थला 6 वा. नामस्मरण-आणि जन्म रात्री 2 वा. पर्यंत भजन संध्या आणि दुसऱ्या दिवशी दुपारी महाप्रसाद कार्यक्रम होऊन कार्यक्रमाची सांगता. कार्यक्रम साधारणतः 22 वर्षपासून सुरू असून आत्ताचे गादीपती प पु प्रसाद महाराज आणि मुल्हेरकर रघुराज महाराज यांच्या हस्ते मंदिराची प्राणप्रतिष्ठा झाली आज तागायत दर गुरुवारी रात्री 9 ते 12 वा पर्यत भजन सुरू असते
   सहभाग..
संत सखाराम महाराज सेवेकरी मंडळ
(जन्मोत्सव-विशेष)

मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला साजरा केला जातो . यावर्षी दत्तात्रेय जयंती ७ डिसेंबर २०२२ रोजी बुधवारी साजरा होणार आहे . भगवान दत्तात्रेय हे तिन्ही देवांचे अवतार होय . ब्रह्मा , विष्णू , महेश या तिन्ही देवांच्या शक्ती भगवान दत्तात्रेयांमध्ये सामावल्या आहेत . त्यांना सहा हात आणि तीन मुख आहेत . त्यांचे वडील ऋषी अत्रि आणि आई अनसूयादेवी होय . दत्तात्रेय भक्तांनी स्मरण करताच त्यांना मदत करण्यासाठी उपस्थित असतात . भगवान दत्तात्रेयांच्या जन्मोत्सव निमित्त मंदिरांन मध्ये विशेष प्रार्थना केल्या जातात आणि ‘गुरुचरित्र’ पारायण पारणे करून . श्रीदत्त जन्मांचा अध्याय वाचतात . आरती , स्तोत्र म्हणतात , प्रसाद वाटप होतो .

जन्मकथा

महर्षी अत्रि मुनींची पत्नी अनुसूया हिच्या पतिव्रता धर्माची चर्चा तिन्ही लोकांमध्ये होऊ लागली . एक दिवशी भगवान् विष्णु व ब्रह्माजी कैलास पर्वतावर अशुतोष भगवान् शंकरजींच्या दर्शनासाठी आपापल्या पत्नी सह आले . तिन्ही देवता सतसंग करीत असता . भगवती पार्वती , देवी महालक्ष्मी , देवी सरस्वती ह्या पण एकमेकांशी चर्चा करु लागल्या त्याचा विषय होता . त्रिभुवनात आपल्या सारख्या पतिव्रता कोणीही नाहीत . लिलाधारी त्रिदेवतानी काय लिला करायचे ठरविले तेच जाणे .
तेव्हा मनोवेगाने भ्रमण करणारे नारदजींनी कैलासावर अचानक आगमन झाले . “नारायण! नारायण” म्हणत त्रिदेवतांना नमन करून , त्रिदेवीन कडे जाऊन त्यांना ही प्रणाम करून . शिव सभे कडे जाऊ लागले . तिन्ही देवीनीं नारदजीना थांबून विचारले . “देवर्षी ! त्रिभुवनात आमच्या सारख्या पतिव्रता कोण आहेत का ?” तेव्हा नारदजीना हासू आले व ते जाऊ लागले . तिन्हीं देवीनां त्यांचे छंद्म हसण्याची शंका आली . त्यांनी नारदास असे का हसलास असे विचारले तेव्हा नारद म्हणाले “सती अनसूयेच्या पतिव्रत धर्माची ख्याति त्रिभुवनात पसरली आहे”, असे सांगितले.
अनुसूयाची स्तुती ऐकून माता पार्वती , लक्ष्मी आणि सरस्वती यांनी अनुसूयाची परीक्षा घेण्याचे ठरवले .
तिन्हीं शक्ती आपल्या पति परमेश्वरा जवळ आल्या व हट्ट करुन सती अनुसूया देवीची पतिव्रताची परिक्षा घेण्यास सांगू लागल्या . लिलाधारींनी एकमेकांकडे बघितले व मान्य करुन ते अत्रि आश्रमा कडे निघाले .
त्रिदेवीयांच्या विनंतीवरून ब्रह्मा , विष्णू आणि शिव हे तिन्ही देव सती अनसूयेच्या पतिव्रता धर्माची परीक्षा घेण्यासाठी पृथ्वीवर पोहोचले . अत्रि मुनीं प्रातःकाळी संध्या गायत्रीजप व दुपारची संध्या झाल्याखेरीज आश्रमा परतत नव्हते .
अंतर्यामी त्रिदेवतांना माहित होते . तिन्ही देव ऋषींच्या वेषात अनसूयेच्या आश्रमात पोहोचले व “भिक्षान्न देही !” अशी घोषणा केली . सती अनसूया आश्रमाच्या बाहेर आली . तिन द्विव्य ऋषींना पाहून अर्ध्यदान देऊन भिक्षा देवू लागली . पण तिन्हीं ऋषिंनी माता अनसूयासमोर भोजन करण्याची इच्छा व्यक्त केली . देवी अनुसूयाने पाहुण्यांचा आदरातिथ्य आपला धर्म मानून त्याची आज्ञा पाळली आणि त्यांना आश्रमात प्रेमाने जेवण वाढले . पण तिन्ही देवतांनी मातेसमोर एक अट घातली की , तिने त्यांना नग्नावस्थेतच जेवायला वाढावे .
या विलक्षण संकटातून बाहेर पडण्यासाठी अनूमातेने आपले पती अत्रि मुनींचे ध्यान , स्मरण केले . त्यांच्या नित्य पादप्राक्षणाचे जल आपल्या कमंडलातून हातात घेतले व पतिचे स्मरण करून तिन्हीं ऋषिरुपी त्रिदेवताच्या अंगावर शिंपडले तेव्हा तिला ऋषींच्या रूपात ब्रह्मा , विष्णू आणि महेश समोर उभे असलेले दिसले ; परंतु उशीर झाला होता . तिन्हींही देव लहान बालक रूपात परिवर्तित झाले होते .*
ते आता सहा महिन्यांचे बाळ झाले होते . त्यांचे ते गोंडस स्वरूप पाहूनच माता अनुस पान्हा फुटला त्रिदेव इच्छित भिक्षा माताने आपल्या छातीस लावून पुर्ण केली . तिन्हीं बाळ तृप्त होऊन . निद्राधीन झाले . त्यांच्या अटीनुसार त्यांना मातेने तृप्त केले होते . अनू मातेने पाळना सजवून तिघांना पाळण्यात घालून . पाळणा हालवू लागली .
द्विसंध्या आटोपून ऋषी अत्रिजी हविष्यान्न साठी आश्रमात आले . तिन्हीं बालकांना पाहूनच अंतर्यामी ऋषींनी त्रिदेवतांना ओळखले . देवी अनसूया ला धन्य-धन्य म्हणून . आपल्या नित्य कर्मास लागले .
इकडे त्या वेळी तिन्ही देवी त्यांच्या पति देवानां पासून विभक्त झाल्यामुळे बराच काळ व्यथित झाल्या होत्या . तिन्हींही देवीनां चिंता वाटू लागली . तेव्हा देवी लक्ष्मी म्हणाली “हिमनंदिनी , देवी पार्वती ! अजूनही आपले स्वामी अनसूयेची परिक्षा घेऊन का बरे आले नाहीत ?” यावर माता पार्वती म्हणाली “चला अत्रिश्रमी , तेथेच समजेल ते का परतले नाहीत ते ?”
अत्रि आश्रमी येताच आपल्या पती देवताना तेथे उपस्थित न बघून . त्या चिंतित झाल्या . तेथे फक्त ऋषी पत्नी पाळणा हलवत होती . त्रिदेवी माता अनसूयेस विनंती करुन विचारले . “देवी ! आमचे पती येथे आले होते का ? , त्यांना बघितलेस का ? आले असतील तर कोठे आहेत ?”
पतिव्रता अनसूया त्यांना म्हणाली – “तूम्ही मोठ्या पतिव्रता आहात ना ; मग पाळण्यात झोपलेल्या पतिनां ओळखले नाही का ?”
आश्चर्यचकित त्रिदेवीनीं पाळण्यात निरखून बघितले ; परंतु त्रिदेव नसून तिन बाळ झोपलेले दिसले . अर्त नजरेने माता अनसूये कडे देव्यांनि बघितले . अत्रि पत्नी म्हणाली “महादेवी ! आपले तिघांचे पती हेच आहेत . यातूनच आपापले पतिदेव उचलावे .” हे वचन ऐकून तिन्हीं देवीनीं पाळण्यातील बाळांना उचलण्याचा प्रयत्न केला . येथेच त्यांची पतिव्रतेची परिक्षा झाली . चुकीचे पतिदेव निवड होत होती . तिघे देवताचे रूपांतर एक शरीर तिन शिरांनीव सहा हातात झाले . तिन्हीं ही देव्यां घाबरल्या . अनसूयेची क्षमा मागितली तेव्हा . पतिव्रता माताने पुन्हा जल शिंपडले , उदक शिंपडताच त्या बाळा मधून तिन्हींही देव ब्रह्मा , विष्णु , महेश प्रकट झाले .
अत्रीऋषींनी त्यांना विनवले की , आपण माझ्या उदरी पुत्ररूपाने जन्म घ्यावा . तिन्ही देवांनी त्यांची विनंती मान्य केली . देवत्रयीच्या आशीर्वादाने अनुक्रमे ब्रह्मापासून सोम म्हणजे चंद्र , विष्णूपासून दत्त आणि शिवापासून दुर्वास हे तीन पुत्र अनुसयेच्या उदरी जन्मला आली . व त्यांनी आश्रमात वास्तव्य केले . शुभम भवतु ! श्रीदत्त नवनाथ गुफे तर्फे आपनांस श्रीदत्त जान्मोत्सवाची हार्दिक शुभेच्छा ! तुम्हावर गुरुकृपा सदैव असो ! 🙏🏻जय हो❗
मार्गशीर्ष पौर्णिमा तिथी सुरू होईल – ७ डिसेंबर सकाळी ८:०२ वाजता मार्गशीर्ष पौर्णिमा तिथी समाप्त – ८ डिसेंबर सकाळी ९ . ३८ मिनिटांपर्यंत – सिद्ध योग – ७ डिसेंबर सकाळी २.५२ मिनिटे ते ८ डिसेंबर सकाळी २.५४ मिनिटे

सर्वार्थसिद्धी योग – ७ डिसेंबर रोजी सकाळी ७ .२५ ते ८ डिसेंबर रोजी सकाळी ६ .४८ पर्यंत
दत्त जन्मोत्सव शुभ मुहूर्त – प्रदोष काळात पौर्णिमेला भगवान दत्तात्रेयांची पूजा केली जाते . या दिवशी चंद्र कृत्तिका-रोहिणी नक्षत्रात आणि वृषभ राशीत सिद्ध योगात असेल .

  • विक्की उत्तम जाधव (संकलन)

Related Posts

आदिशक्तीच्या आराधनेचा आजपासून मंगलारंभ!
जळगाव

आदिशक्तीच्या आराधनेचा आजपासून मंगलारंभ!

October 11, 2026
श्री मंगळ ग्रह मंदिरात दुर्गामातेच्या अखंड ज्योतींचे भक्तिभावात स्वागत !
जळगाव

श्री मंगळ ग्रह मंदिरात दुर्गामातेच्या अखंड ज्योतींचे भक्तिभावात स्वागत !

October 11, 2026
दुष्काळाच्या संकटात ‘राजूमामा’ धावले : मुख्यमंत्री सहायता निधीला २ लाखांची मदत; सक्षम नागरिकांनाही मदतीचे आवाहन!
जळगाव

दुष्काळाच्या संकटात ‘राजूमामा’ धावले : मुख्यमंत्री सहायता निधीला २ लाखांची मदत; सक्षम नागरिकांनाही मदतीचे आवाहन!

October 7, 2026
आधुनिक सिंचन व डिजिटल शेतीसाठी महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहूरी आणि जैन इरिगेशन यांच्यात सामंजस्य करार !
जळगाव

आधुनिक सिंचन व डिजिटल शेतीसाठी महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहूरी आणि जैन इरिगेशन यांच्यात सामंजस्य करार !

October 6, 2026
नशामुक्तीचा संदेश, सायबर फसवणुकीला आळा : जळगाव पोलिसांची जनजागृती मोहीम सुरू !
जळगाव

नशामुक्तीचा संदेश, सायबर फसवणुकीला आळा : जळगाव पोलिसांची जनजागृती मोहीम सुरू !

October 6, 2026
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ‘विचार वारसा फाउंडेशन’चा पुढाकार : नवरात्रोत्सवातील देणगी शेतकरी बांधवांना सुपूर्द करणार !
जळगाव

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ‘विचार वारसा फाउंडेशन’चा पुढाकार : नवरात्रोत्सवातील देणगी शेतकरी बांधवांना सुपूर्द करणार !

October 6, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

तालुक्यातील ५१ वर्षीय शेतकऱ्याचा शेतात आढळला मृतदेह !

October 15, 2026
बनावट बिलं तयार करत २ कंपनीची ४६ लाखांची फसवणूक ; ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

‘आम्ही पोलीस आहोत, पुढे खून झालाय!’ म्हणत वृद्ध दाम्पत्याला गंडा; ९० हजारांचे दागिने लंपास!

October 15, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !

. चाळीसगावात १३ वर्षीय मुलीच्या लैंगिक छळाचे गंभीर प्रकरण; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल!

October 15, 2026
घराला कुलूप, चोरट्यांचा डल्ला; सत्यम पार्कमध्ये दीड लाखांचा ऐवज लंपास !

. सेफ्टी दरवाजाचे लॉक तोडले, कपाट फोडले; चोरट्यांनी लंपास केले लाखोंचे दागिने!

October 15, 2026

Recent News

पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

तालुक्यातील ५१ वर्षीय शेतकऱ्याचा शेतात आढळला मृतदेह !

October 15, 2026
बनावट बिलं तयार करत २ कंपनीची ४६ लाखांची फसवणूक ; ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

‘आम्ही पोलीस आहोत, पुढे खून झालाय!’ म्हणत वृद्ध दाम्पत्याला गंडा; ९० हजारांचे दागिने लंपास!

October 15, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !

. चाळीसगावात १३ वर्षीय मुलीच्या लैंगिक छळाचे गंभीर प्रकरण; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल!

October 15, 2026
घराला कुलूप, चोरट्यांचा डल्ला; सत्यम पार्कमध्ये दीड लाखांचा ऐवज लंपास !

. सेफ्टी दरवाजाचे लॉक तोडले, कपाट फोडले; चोरट्यांनी लंपास केले लाखोंचे दागिने!

October 15, 2026

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group