जळगाव मिरर | २७ जून २०२४
गेल्या काही महिन्यापासून राज्यातील अनेक ठिकाणी प्रेम प्रकरणाच्या माध्यमातून नेहमीच हाणामारी व खुनाच्या घटना घडत असतांना अशीच एक थरारक घटना नागपूर शहरातील कपिल नगर परिसरात घडली आहे. चारित्र्याच्या संशयावरून पतीनेच आपल्या पत्नीचीची हत्या केली असल्याचे समोर आले आहे. जवळपास दोन वर्षांपूर्वी या जोडप्याचा प्रेमविवाह झाला होता. मन्नत कौर विर्क असे मृत पत्नीचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी दिलप्रीत सिंग विर्क याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
आरोपी दिलप्रीत विर्क आणि मृत मन्नत कौर यांचा 2022 मध्ये प्रेमविवाह झाला होता. मात्र मागील काही दिवसापासून दोघांमध्ये सतत खटके उडत होते. त्यातच मंगळवारी 25 जूनच्या रात्री हा वाद एवढा विकोपाला गेला होता. या वादातून संतापाच्या भरात आरोपी दिलप्रीत सिंगने पत्नी मन्नतवर लोखंडी रॉडने वार करून तिला ठार केले.
या प्रकरणी पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस करत आहे. विशेष म्हणजे हत्येच्या एक दिवसापूर्वीच मन्नत विर्क हिने आपल्या भावासह पोलीस स्टेशनमध्ये धाव घेत मनप्रीत विरोधात तक्रार दाखल केली होती. आपल्या जीवाला पती दिलप्रीत पासून धोका असल्याची तक्रार मन्नतने दिली होती. मात्र पोलिसांनी वेळेत कारवाई केली नाही आणि दुसऱ्याच दिवशी मन्नत विर्कची हत्या झाली.