जळगाव मिरर | राजकीय विशेष
राज्यात विधानसभा निवडणूक सुरु झाली असून प्रथम भाजपने पहिली यादी जाहीर केली तर दि.२२ रोजी रात्री शिंदेंच्या शिवसेनेची त्यानंतर राज ठाकरे यांच्या मनसेची दुसरी यादी जाहीर झाली यात जळगाव शहर विधानसभा मतदार संघासाठी नवखा उमेदवार दिल्याने जळगावात मनसे कार्यकर्ते नाराज झाल्याची सध्या जळगावात सुरु झाली आहे.
जळगाव शहर विधानसभा मतदार संघात भाजपचे उमेदवार जाहीर झाले असून महाविकास आघाडीचे उमेदवार देखील लवकरच जाहीर होणार आहे. त्यापूर्वी मनसेने यंदा जळगाव शहर विधानसभा मतदार संघासाठी नवखा उमेदवार दिल्याने जळगाव शहरात गेल्या अनेक वर्षापासून मनसे व राज ठाकरे यांच्या विचाराने प्रेरित होवून अनेक वर्षापासून काम करणारे पदाधिकारी व कार्यकर्ते नाराज झाल्याची चर्चा सध्या जळगाव सुरु आहे. मनसेतर्फे जळगाव शहरात गेल्या अनेक महिन्यापासून दोन ते तीन पदाधिकारी विधानसभेसाठी इच्छुक होते मात्र निवडणूक लागताच नवखा उमेदवार दिल्याने पदाधिकारी नाराज झाले आहे.
निष्ठावंत मनसे पदाधिकारी लागले होते कामाला
गेल्या दोन वर्षापासून पक्षातील काही पदाधिकारी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून उपोषण, आंदोलन, मोर्चा काढत वेळोवेळी नागरिकांच्या समस्येसाठी धावून जात होते मात्र पक्षाने निवडणुकीच्या उमेदवारीच्या यादीत पदाधिकाऱ्याना टाळल्याने आता हे पदाधिकारी नाराज झाले असल्याची देखील चर्चा सुरु झाली आहे.
