रक्षाबंधनाच्या सणाची सगळे आतुरतेने वाट तर बघतच आहेत पण त्याचबरोबर तुम्हाला एलपीजी सिलेंडर दरात रक्षांबंधनाच्या दिवशी कपात होणार असल्याचे कळले तर तुमचा आनंद नक्कीच दुप्पट होणार आहे. होय ! गेल्या एक ऑगस्टला फक्त कमर्शियल सिलेंडरच्या दरातच कपात झाली होती. त्यावेळी घरघुती सिलेंडरच्या दरात काहीही बदल झाले नव्हते.
आता सिलेंडरचं वजन असणार ७ किलो कमी
आपण ज्या सिलेंडरविषयी बोलतोय ते कंपोजिट सिलेंडर असणार आहे. हे सिलेंडर ७५० रुपयांच्या दरात मिळणार आहे. तब्बल ६ दशकानंतर आता घरघुती सिलेंडरमध्ये गॅस कंपनी बदल करतेय. बाजारात येणारं कंपोजिट सिलेंडर हे लोखंडी सिलेंडरपेक्षा वजनाने ७ किलो हलके असणार आहे. आपण आतापर्यंत वापरत असणारं घरघुती सिलेंडरचं वजन १७ किलो असायचं आणि त्यात गॅस भरल्यानंतर त्याचं वजन ३१ किलोच्या थोडं जास्त असायचं. आता कंपोजिट सिलेंडरचं वजन १० किलो असणार आहे. आणि त्यात गॅस १० किलो असणार.
दहा किलो वजन असणाऱ्या सिलेंडरचे शहरानुसार दर
दिल्ली – 750 रुपये
मुंबई – 750 रुपये
कोलकाता – 765 रुपये .
चेन्नई – 761 रुपये,
लखनऊ – 777 रुपये ,
जयपुर – 753 रुपये,
पटना – 817 रुपये,
इंदौर – 770 रुपये,
अहमदाबाद – 755 रुपये,
पुणे – 752 रुपये
गोरखपुर – 794 रुपये
भोपाल – 755 रुपये
आगरा – 761रुपये
रांची – 798 रुपये
वाढलेल्या एलपीजी सिलेंडरच्या दरामुळे दैनंदिन जीवनातील बऱ्याच गोष्टींचे दर वेगाने वाढले होते. मात्र आता नवे दर ऐकून निश्चितच गृहिणींना दिलासा मिळणार आहे.