जळगाव मिरर । १३ जानेवारी २०२३ ।
सध्या राज्यात धुमाकूळ घालणारा अभिनेता रितेश देशमुख आणि जिनिलिया डिसुजा-देशमुख यांच्या वेड या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कामगिरी केली आहे.
‘वेड’ या मराठी चित्रपटांना बऱ्याच बड्या बड्या चित्रपटांना मागे टाकले आहे. अवघ्या महाराष्ट्राला वेड लावणाऱ्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर आपली जादू दाखवली आहे. सलग दुसऱ्या आठवड्यातही हा चित्रपट आपले स्थान टिकवून ठेवले आहे. सलग १४व्या दिवशी या चित्रपटाने १.५३ कोटींची कमाई केली आहे. यासोबतच या चित्रपटाने एकूण ४०.१७ कोटींचा गल्ला जमवला आहे.
वेड या चित्रपटाने कमाईच्या बाबतील सैराट चित्रपटाचा रेकॉर्ड तोडला आहे. सैराट या चित्रपटाने आजवर प्रदर्शित झालेल्या सर्व मराठी चित्रपटांचे कमाईच्या बाबतीत रेकॉर्ड ब्रेक केले होते. मात्र, या चित्रपटाचा विक्रम मोडीत काढत वेडने एका दिवसात सर्वाधिक कमाई करणारा मराठी चित्रपट हा बहुमान पटकावला आहे. या चित्रपटाने एका दिवसांत ५.६० कोटी रुपयांची कमाई केली आहे.