जळगाव मिरर | १९ फेब्रुवारी २०२६
रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त वासुमित्रा फाउंडेशनतर्फे आज रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. मागील वर्षाप्रमाणे यावर्षीही शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून एकूण ५२ रक्तदात्यांनी स्वेच्छेने रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली.
या प्रसंगी माजी उपनगराध्यक्ष श्री. वासुभाऊ सोनवणे, नगरसेवक श्री. गणेश भाऊ सोनवणे, वासुमित्रा फाउंडेशनचे अध्यक्ष भूषण सोनवणे, उपाध्यक्ष जयेश पाटील, शशिकांत पाटील, श्रीकांत सोले, संदीप येवले, प्रशांत सोनवणे, उद्योजक सागर भाऊ पाटील, मनोज निंबाळकर, बबलू सपकाळे, योगेश सोनवणे, केतन सोनवणे, विनोद ढमाले, देवेंद्र मराठे, शुभम बोदडे, गितेश पवार, मारुती माळी, हेमंत रोकडे, योगेश निंबाळकर, निलेश निंबाळकर, गोलू सोनार, सचिन डोळे, रोशन वाघ, मिलिंद सोनवणे, मयूर सोनवणे, पवन सोनवणे आदी मान्यवर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी रक्तदानाचे महत्त्व अधोरेखित करत युवकांनी सामाजिक उपक्रमांत सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वासुमित्रा फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.
शनिवारी होणार भव्य कीर्तन !
वासुमित्रा फाउंडेशनतर्फे दि.२१ रोजी शनिवारी सायंकाळी ०७:०० वा रामेश्वर कॉलनी परिसरातील श्री स्वामी समर्थ चौक येथे सार्वजनिक शिवजयंती उत्सवसमितीतर्फे किर्तनकार कट्टर हिंदुत्ववादी. ह.भ.प. अनिल महाराज देवळेकर यांचे भव्य कीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी या कार्यक्रमास असंख्य नागरिकांसह शिवभक्तांनी उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.




















