जळगाव मिरर / १४ ऑक्टोबर २०२२
कुणाचेही सौंदर्या इतके छान असते कि त्या व्यक्तीचे वय हे त्याच्या सौंदर्यामध्ये लपून जात असते, नेहमीच सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असलेली सेलिब्रेटी म्हणजे मलायका आहे, इंस्टावर तिचे लाखो फॉलोवर आहेत. काही हि झाले तरी मलायकाच्या फोटोवर आणि व्हिडिओवर कमेंट करणाऱ्यांची संख्या कधीच कमी दिसत नाही. काहीही झालं तरी सध्या मलायकाचा रॅम्प वॉक हा नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतो आहे. यात तिचा सुंदर लूक पाहून नेटकरी भारावून गेले आहेत.
४८ वर्षांची मलायका पण तिचा फिटनेस हा तरुण अभिनेत्रींना लाजवणारा आहे. बॉलीवूडमध्ये तर फिटनेस फ्रिक म्हणून ती लोकप्रिय आहे. नित्यनेमाने जीम आणि योगा करणारी मलायका या वयातही कमालीची सुंदर दिसते आहे. तिनं अनेकदा तिच्या मुलाखतीतून तिच्या आहार आणि व्यायामाविषयी चाहत्यांना सांगितले आहे. कोरोनाच्या काळात देखील तिनं चाहत्यांसाठी खास फिटनेसचे व्हिडिओ शेयर केले होते. सध्या तिच्या व्हायरल झालेल्या त्या व्हिडिओवर चाहते फिदा झाले आहेत.
विरल भयानीनं शेयर केलेल्या त्या व्हिडिओमध्ये मलायका रॅम्प वॉक करताना दिसत आहे. या वयातही तिचा रॅम्प वॉक प्रभावी आहे. लॅक्मेच्या फॅशन वीकमध्ये तिनं आपल्या सौंदर्याची जादू दाखवून दिली. यावेळी उपस्थित प्रेक्षकांनी तिच्यावर कौतूकाचा वर्षाव केल्याचे दिसून आले. अर्थात त्यावरुन काही नेटकऱ्यांनी तिला ट्रोलही केले आहे. त्यात एकानं तर आंटी आता तुम्ही तुमच्या सौंदर्याचे प्रदर्शन करणं बस्स करा. अशा शब्दांत मलायकावर टीका केली आहे. तर अनेकांनी तिच्या ड्रेसिंग स्टाईलवर कमेंट केल्या आहेत.
मलायकानं त्या रॅम्प वॉकमध्ये ब्ल्यु स्कर्ट परिधान केला आहे. याचवेळी तिनं शोल्डर मॅचिंग ब्रालेट टॉप देखील घातला आहे. याशिवाय फ्लोटिंग श्रगही टीम अप केलं आहे. अशा लूकमध्ये ती कमालीची देखणी दिसत असल्याचे तिच्या चाहत्यांचे म्हणणे आहे. त्या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी कमेंटचा वर्षाव केल्याचे दिसून येत आहे. यापूर्वी देखील मलायकाच्या वेगवेगळ्या व्हिडिओला नेटकऱ्यांचा जोरदार प्रतिसाद मिळाला आहे.