अमळनेर : विक्की उत्तम जाधव
येथील मंगळग्रह सेवा संस्थेस रेडिओ सिटी 91.1 एफएम या लोकप्रिय रेडिओचा उत्तर महाराष्ट्र स्तरीय सिटी आयकॉन अवॉर्ड जाहीर झाला आहे. 18 जुलै 2023 रोजी नाशिक येथील ग्रँड रिओ हॉटेल येथे सिने अभिनेता सिद्धार्थ जाधव, श्वेता गुलाटी आणि परितोष पेंटर यांच्या शुभहस्ते सायंकाळी एका शानदार समारंभामध्ये हा अवॉर्ड संस्थेस दिला जाणार आहे.
मंगळ ग्रह संस्थान अमळनेर, हा अवॉर्ड देण्या योग्य समजल्याबद्दल संपूर्ण अमळनेरकर नागरिक रेडिओ सिटी चे मनस्वी ऋणी आहोत, असे संस्थेचे अध्येक्ष राजू महाले सर यांनी बोलून दाखवले. .श्री मंगळदेव ग्रहाने आम्ही करीत असलेल्या अल्प- स्वल्प सेवेला कबूल केल्याचे हे प्रतीक आहे. जनसामान्यांसह लाखो भक्त- भाविक आणि पर्यटकांच्या विश्वासाचे हे फळ आहे. हा अवॉर्ड आम्ही श्री मंगळदेव ग्रहाच्या चरणी आणि श्री मंगळदेव ग्रह मंदिराच्या लाखो भाविक- भक्त आणि पर्यटकांना सविनय समर्पित करतो…!!!