जळगाव मिरर | १ जानेवारी २०२५
शहरातील हरिविठ्ठल नगराच्या बाजारात भाजीपाला खरेदी करतांना आलेल्या इसमाने ज्योती भानुदास कापूरे (वय ४९, रा. कोठारीनगर) यांच्या गळ्यातून २४ हजारांची मंगलपोत चोरुन नेली. ही घटना दि. २४ डिसेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी रामानंद नगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील कोठारी नगरात ज्योती भानुदास कापूरे या महिला वास्तव्यास आहे. दि. २४ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास हरिविठ्ठल नगरच्या बाजारात भाजीपाला खरेदी करण्यासाठी गेल्या होत्या बाजार करीत असतांना त्यांना मागून एका अज्ञात इसमाने धक्का दिला. त्यावेळी महिला स्वतःला सावरत मागे वळून बघितले. मात्र तो इसम दिसून आला नाही- दरम्यान, त्या महिलेने गळ्याला हात लावला असता, त्यांना गळ्यातील मंगलपोत दिसून आली नाही. त्यांनी आरडाओरड करीत माझी पोत शोधण्यास मदत करा असे सांगितले. यावेळी त्याठिकाणी असलेल्यांनी महिलेची मंगलपोत शोधण्यास मदत केली. मात्र तरी देखील त्या महिलेची मंगलपोत मिळून आली नाही. त्यानंतर सोमवारी महिलेने रामानंद नगर पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.