जळगाव मिरर | १७ फेब्रुवारी २०२५
राज्यात मोठ्या उत्साहात यंदा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचे अनेक ठिकाणी आयोजन करण्यात येत असतांना बुलढाणा जिल्ह्यामध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. आमदार संजय गायकवाड यांनी वाघ्या- मुरळी च्या गाण्यावर धरलेला ठेका सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. या कार्यक्रमात आमदार संजय गायकवाड यांनी वाघ्या – मुरळी च्या एका गीतावर ठेका धरला होता.
सध्या विविध समाज माध्यमांवर हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. या आधी आपल्या मुलाच्या लग्नात देखील आमदार संजय गायकवाड तुफान नाचले होते. त्यावेळी देखील त्यांचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला होता.
राज्यात सर्वत्र शिवजयंतीचा उत्साह पाहायला मिळत आहे. शिवजयंती साजरी होण्या आधीच राज्यातील सर्व जिल्ह्यात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. बुलढाणा जिल्ह्याचे आमदार संजय गायकवाड यांच्या जिल्हात देखील अशाच विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात वाघ्या – मुरळी च्या एका गाण्यावर आमदार संजय गायकवाड यांनी देखील ठेका धरला. हा व्हिडिओ आता व्हायरल होत आहे.