जळगाव मिरर | ९ ऑक्टोबर २०२३
गेल्या काही वर्षापासून राज्यातील टोल बाबत मनसे नेहमीच आक्रमक भूमिका घेत असतेत. पुन्हा एकदा महाराष्ट्र नवनिर्मण सेनेने टोलनाक्याच्या मुद्द्यावरून आक्रमक होत मनसे नेते अविनाश जाधव यांनीही मुलुंडच्या आनंदनगर टोलनाक्यावर आंदोलन केलं. याप्रकरणी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं आहे, असं बोललं जात आहे. त्यांच्यसह १२ मनसे कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गुन्हा दाखल या सर्व मनसे कार्यकर्त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी मुलुंडच्या वीर सावरकर रुग्णालयात नेण्यात आले आहे. आजची रात्र मनसे कार्यकर्त्यांना तुरुंगातच काढावी लागू शकते, असं बोललं जात आहे. दरम्यान , आज राज ठाकरे पत्रकार परिषद घेऊन म्हणाले आहेत की, ”टोल हा महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा घोटाळा आहे.
याची शहानिशा झाली पाहिजे. याप्रश्नानी मी मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे. त्यांच्याकडून काय उत्तर येतंय ते पाहू.” ते म्हणाले, ”फडणवीसांनी म्हटल्याप्रमाणे कार, चारचाकी, तीनचाकी आणि दुचाकीला टोल नाही आहे. यासाठी आमची माणसं रस्त्यावर उतरतील आणि जिथे टोल घेतला जातोय, तेथे हे थांबवले जाईल. आम्हाला विरोध करण्याचा प्रयत्न केला तर असे टोलनाके आम्ही जाळून टाकू.”