जळगाव मिरर | २२ एप्रिल २०२४
जिल्ह्यातील वेगवेगळ्या ठिकाणाहून जळगावात शिक्षणासाठी आलेल्या चार विद्यार्थ्यांचे मोबाईल त्यांच्या खोलीतून चोरट्याने चोरून नेले. ही घटना शाहूनगर परिसरात राहत असलेल्या खोलीमध्ये शनिवार दि. २० रोजी सकाळच्या सुमारास घडली. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील वेगवेगळ्या तालुक्यातून तसेच नंदुरबार जिल्ह्यातील काही विद्यार्थी जळगावात शिक्षणासाठी आले आहेत. हे विद्यार्थी शहरातील शाहूनगर परिसरातील भोईटे गल्ली परिसरात खोली घेऊन राहतात. दि. २० रोजी नित्य कामात असताना सकाळी सव्वा सहा ते पावणे सात वाजेदरम्यान त्यांच्या खोलीतून चोरट्याने सात मोबाईल चोरून नेले. यामध्ये रोहित मोहन राठोड (वय २४, रा. उजलोद, ता. शहादा), संदीप विठ्ठल पाटील (वय २४, रा. गोजोरा, ता. पाचोरा), अविनाथ विजय धनगर (वय २३, रा. गिरड, ता. भडगाव), विरेंद्र भरत पाटील (वय २३, नाचणखेडा, ता. पाचोरा) या चार विद्यार्थ्यांचे एकूण ३० हजार रुपये किमतीचे मोबाईल चोरून नेले. या प्रकरणी रोहित राठोड याने शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ उमेश भांडारकर करीत आहेत.