जळगाव मिरर | ९ ऑक्टोबर २०२४
उसनवारीच्या पैशावरून वाद होऊन अरुण भागवत भोई (वय ४५, रा. नशिराबाद, ता. जळगाव) यांना मारहाण व चाकू हल्ला प्रकरणातील फरार असलेल्या मालती विनोद नन्नवरे (वय ३१, रा. जळगाव) या महिलेला मंगळवार दि. ८ ऑक्टोबर रोजी जळगावातून अटक करण्यात आली. तिला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.
मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव तालुक्यातील नशिराबाद येथील अरुण भोई यांचा उसनवारीच्या पैशातून काही जणांसोबत वाद झाला. या वादातून त्यांना मारहाण करुन त्यांच्यावर चाकूनेवार करुन गंभीर जखमी केल्याची घटना दि. ३१ मार्च रोजी नशिराबाद येथे घडली होती. याप्रकरणी संशयित मालती नन्नवरे या महिलेविरुत्र गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यापासून ही महिला फरार होती. दरम्यान, ती जळगाव येथे घरी आल्याची माहिती नशिराबाद पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक आसाराम मनोरे यांना मिळाली. त्यानुसार नशिराबाद पोलिसांनी सदर महिलेला अटक केली. तिला न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.