
जळगाव मिरर । २१ डिसेंबर २०२२
शहरातील एका परिसरात वास्तव्यास असलेल्या मुलाने आई नातेवाइकाच्या लग्नाला गेलेली असल्यामुळे तो घरात एकटा असल्याने गळफास घेत आपली जीवयात्रा संपविल्याची दुर्दैवी घटना रविवारी सायंकाळी घडली. श्याम रमेश खर्चाने (४८) असे मृताचे नाव आहे.
सविस्तर वृत्त असे कि, शहरातील कोल्हे हिल्स परिसरातील शिवबानगरात दोन वर्षांपासून पत्नी माहेरी असल्यामुळे श्याम खर्चाने हे शिवबा नगरात आईसह वास्तव्यास होते. खासगी वाहन चालवून ते कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचे. नातेवाइकाचे लग्न असल्यामुळे त्यांच्या आई शनिवारी सावदा येथे गेल्या होत्या. त्यामुळे श्याम हे घरात एकटेच होते. त्यांनी रविवारी गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविली. सायंकाळी त्यांच्या आई घरी परतल्या तेव्हा त्यांना मुलाने गळफास घेतल्याचे दिसून आले.
तालुका पोलिसांच्या मदतीने मृतदेह खाली उतरविण्यात आला. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी श्याम खर्चाने यांना मृत घोषित केले. सोमवारी शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. या प्रकरणी तालुका पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. तपास अनिल फेगडे हे करीत आहेत.




















