जळगाव मिरर । १ डिसेंबर २०२२
जळगाव मनपाच्या नवनियुक्त आयुक्तपदी देविदास पवार यांची नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी लागलीच पदभार स्वीकारला. तर आज दिनांक १ रोजी नारीशक्ती ग्रुप व महिला पर्यावरण सखीमंच तर्फे आयुक्त पवार यांचा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी अध्यक्ष मनिषा पाटील यांनी नारीशक्ती बहुद्देशीय संस्थेच्या राबविलेल्या उपक्रमांची माहिती देऊन आगामी काळात होणाऱ्या नियोजनाबद्दल सांगितले. या प्रसंगी नेहा जगताप, मरियम बुगडवाला भाग्यश्री महाजन ,संगीता चौधरी किमया पाटील उपस्थित होते.