जळगाव मिरर | ७ सप्टेंबर २०२५
दि. ६ शनिवार रोजी अनंत चतुर्दशी म्हणजेच गणपती विसर्जन यानिमित्ताने पर्यावरणाचा ऱ्हास होऊ नये म्हणून पर्यावरण वाचविण्याच्या दृष्टीने पर्यावरणपूरक निर्माल्य संकलन हा उपक्रम मेहरुण तलाव गणेशघाट जळगाव येथे नारीशक्ती बहुउद्देशीय संस्थेच्यावतीने राबविण्यात आला. निर्माल्य पाण्यात विसर्जन करून कोणत्याही प्रकारची जलहानी होऊ नये तसेच परिसरात प्रदूषण होणारे रोखण्याच्या दृष्टीने सर्व निर्माल्य एकाच ठिकाणी संकलित करून त्याची विल्हेवाट लावण्यासाठी नारीशक्ती बहुउद्देशीय संस्था जळगाव ग्रूपच्या महिलांनी निर्माल्य संकलन सकाळी 8.30 ते दुपारी 3.00 वाजेपर्यंत केले.
निर्माल्य संकलन करण्यात आले. नारीशक्तीने श्रमदान करून श्री गणेश विसर्जनासाठी अनमोल सहकार्य केले. या प्रसंगी संस्थापक अध्यक्ष मनिषा पाटील, नूतन तासखेडकर, हर्षा गुजराती, रेणुका हिंगु, किमया पाटील शोभना मकवाना, संगीता चौधरी, नीता वानखेडकर, नेहा जगताप, तेजल वनरा, जानवी जगताप उपस्थित होते. निर्माल्य संकलन करून श्री गणरायाला भावपूर्ण निरोप नारीशक्ती तर्फे देण्यात आला.