जळगाव मिरर | ३० जुलै २०२५
शहरातील नारीशक्ती बहुउद्देशीय संस्था, जळगाव यांच्यातर्फे दि. ३० रोजी शकुंतला जे प्राथमिक विद्यालयात गरजू विद्यार्थ्यांना गणवेश वाटप कार्यक्रम संपन्न झाला. या उपक्रमांतर्गत विद्यालयातील ३२ विद्यार्थ्यांना गणवेश वितरित करण्यात आले.
डॉ. प्राची महाजन आणि डॉ. गौरव महाजन तसेच सौ. मनिषा पाटील (अध्यक्ष, नारीशक्ती बहुउद्देशीय संस्था) यांच्या दातृत्वातून हा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमामुळे गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणात सातत्य ठेवण्यास प्रोत्साहन मिळाले असून, सामाजिक बांधिलकीचे उत्तम उदाहरण समाजासमोर ठेवले आहे. कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. प्राची महाजन, सौ. जागृती धूत, श्री. आशीष धूत, वंदना मंडावरे, अॅड. सीमा जाधव, किमया पाटील, हर्षा गुजराथी, आशा मौर्य, स्मिता पाटील, निता वानखेडकर आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका नेहा जंगले यांनी केले, तर सूत्रसंचालन लक्ष्मी भालेराव यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी राहुल चौधरी आणि स्वाती जंगले यांनी विशेष परिश्रम घेतले.
