जळगाव मिरर / २९ जानेवारी २०२३
नाशिक शहरातील एका कुटुंबातिल तिघांनी घेतला गळफास घेत आपली जीवनयात्रा संपविल्याची धक्कादायक घटना आज दुपारी उघकीस आली आहे. यामुळे परिसरातील नागरिकांनी एकच शोक व्यक्त केला आहे.
नाशिक शहरातील राधाकृष्ण नगरात एकाच कुटुंबातिल तिघांनी घेतला गळफास घेत आपली जीवनयात्रा संपविल्याची घटना घडली आहे. राधाकृष्ण नगर आशापुरी निवास बोलकर पोलीस चौकी समोर राहणारे ५५ वर्षीय वडील दीपक शिरोडे, मोठा मुलगा प्रसाद शिरोडे (वय २५), राकेश शिरोडे (वय २३) यांनी एकाच घरात तीन वेगवेगवेगळ्या खोलीत गळफास घेत आपली जीवनयात्रा संपविली आहे. रविवारी दुपारी ३ ते साडेतीन च्या दरम्यान घरी कुणीच नसताना हा प्रकर घडला. दीपक शिरोडे हे अशोक नगर बस स्टॉप जवळ फळ विक्री व्यवसाय करतात. दरम्यान पत्नी व आई या ही दुपारी कामानिमित्त बाहेर गेल्या होत्या, त्या घरी आल्यावर प्रकार लक्षात आला. मात्र आत्महत्येमागे नेमकं काय कारण आहे हे अद्याप समोर आलेले नाही.