
अमळनेर : विक्की उत्तम जाधव
श्रीमती द्रौ.रा.कन्या शाळेत राष्ट्रीय खेळ दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जे.व्ही.बाविस्कर यांनी केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या मुख्याध्यापिका एस.एस. सूर्यवंशी होत्या.क्रिडा शिक्षिका आर.एस.सोनवणे व शिक्षक जे.व्ही.बाविस्कर यांनी विद्यार्थ्यांना खेळाच्या संदर्भात माहिती दिली. यावेळी शाळेतील दिडशे विद्यार्थी वेगवेगळ्या खेळात सहभागी झाले. मुख्याध्यापिका एस.एस. सूर्यवंशी यांनी शासनाच्या परीपत्रकानुसार राज्यात क्रिडा सप्ताह आयोजित केला आहे,हे सांगत विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबर खेळ सुद्धा महत्वाचे आहेतअसे सांगितले. शासनाच्या पत्रकानुसार संगीत खुर्ची, लिंबू चमचा,कबड्डी, गोणपाट व रस्सीखेच स्पर्धा, धावणे शर्यत अश्या विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या. विजेत्या संघास मेजर ध्यानचंद ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले. त्यावेळी शाळेच्या जेष्ठ शिक्षिका एस.पी.बाविस्कर, पर्यवेक्षक व्ही.एम. पाटील, एस.एस.माळी,करुणा शिक्षक डि.एन.पालवे, एस.एस.वाघ,डि.एम.निगोड हे शिक्षक उपस्थित होते. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी शाळेचे शिक्षक-शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.





















