जळगाव मिरर | १७ मार्च २०२४
राज्यातील अमरावती मतदार संघातील राणा परिवार नेहमीच राजकीय वक्तव्य व आंदोलनांच्या निमित्ताने नेहमीच चर्चेत असते. खासदार नवनीत राणा या भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवलीत अशी शक्यता अनेक दिवसांपासून वर्तवली जात आहे. आता नवनीत राणा यांनी देखील याबाबत संकेत दिले आहेत. लक्ष्मीच्या हाती नेहमी कमळ असते, त्यावर कोणीही डाऊट घेऊ नये, असं नवनीत राणा म्हटलंय.
तर भाजप प्रवेशावर योग्य वेळी योग्य निर्णय कळवण्यात येईल. आम्ही एनडीएमध्ये आहोत. आमची देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा झाली आहे. आम्ही जो निर्णय घेऊ आमच्या पाठीशी देवेंद्र फडणवीस नेहमी राहतील, असा दावा नवनीत राणा यांनी केला आहे.
आज माझ्या पक्षाने मला विश्वास दिला आहे की कोणत्याही निर्णयासोबत ते माझ्या पाठीमागे राहतील. जो काही निर्णय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, देवेंद्र फडणवीस आणि रवी राणा घेतील, त्यांच्या शब्दाच्या बाहेर मी जाणार नाही, असंही नवनीत राणा यांनी म्हटलं.
रवी राणा याबाबत म्हटलं की, एखाद्या परिवारातील व्यक्ती दुसऱ्या परिवारामध्ये जाती तेव्हा डोळ्यातून अश्रू येते. ज्या खासदाराला युवा स्वाभिमान पक्षाने निवडून दिलं, त्याला देशातील सर्वात मोठ्या पक्षांमध्ये जर काम करायची संधी मिळत असेल तर युवा स्वाभिमान पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू येतील.
देशाच्या विकासासाठी व जिल्ह्याच्या विकासासाठी देशाचे पंतप्रधान काम करत आहेत. त्यामुळे देशाच्या पंतप्रधानांसोबत काम करण्यासाठी आमचा खासदार देता येत असेल तर आम्हाला त्याचा सार्थ अभिमान आहे. त्यांच्यासोबत युवा स्वाभिमान पार्टी व मी स्वतः ताकतीने उभा आहे, असंही रवी राणा यांनी म्हटलं.