
जळगाव मिरर । २ डिसेंबर २०२२
परभणी येथे होणाऱ्या राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी कबड्डी स्पर्धेवर निवड समिती सदस्य म्हणून नयनसागर मणी यांची निवड करण्यात आली आहे.
महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसियशनतर्फे दिनांक 3 ते 6 डिसेंबर 2022 रोजी होणाऱ्या 49 व्या कुमार/कुमारी राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी कबड्डी स्पर्धेत कुमारी गटावर निवड समिती सदस्य म्हणून जळगांव जिल्ह्याचे नयनसागर मणी यांची निवड करण्यात आली त्यांच्या या निवडीबद्दल जळगांव जिल्हा कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष मोहनराव भावसार, कार्याध्यक्ष राधेश्याम कोगटा,सरकार्यवाह नितीन बरडे, उपाध्यक्ष बशीर बागवान, चंद्रकांत लोढाया, खजिनदार सुनील राणे संयुक्त कार्यवाह अॅलेक्सझांडर मणी, चैत्राम पवार, ॲड. रोहन बाहेती, बी. एन. पाटील, संजय संसारे, हितेश सोनी, अनिल कोळी,विवेक पाटील,प्रा. हरिष शेळके यांनी अभिनंदन केले.




















